PAK vs ENG : हॅरी ब्रूकचं त्रिशतक, वीरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड ब्रेक
GH News October 10, 2024 10:13 PM

इंग्लंडच्या हॅरी ब्रूक याने मुल्तानमध्ये पाकिस्तान विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इतिहास घडवला. हॅरी ब्रूकने सामन्यातील चौथ्या दिवशी त्रिशतक झळकावलं. ब्रूकने अवघ्या 310 चेंडूत 300 धावांचा टप्पा गाठला. ब्रूक इंग्लंडकडून वेगवान त्रिशतक करणारा पहिला फलंदाज ठरला. तसेच ब्रूकने इंग्लंडसाठी तब्बल 34 वर्षांनंतर कसोटी त्रिशतक केलं. ब्रूकआधी 1990 साली ग्राहम गूच यांनी टीम इंडिया विरुद्ध 333 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आता ब्रूकने त्रिशतकी धमाका केला आहे.

मुलतानमधील वेगवान त्रिशतक

हॅरी ब्रूक या त्रिशतकासह मुलतानचा नवा सुलतान ठरला आहे. हॅरी ब्रूक मुल्तानमध्ये सर्वात वेगवान त्रिशतक करणारा फलंदाज ठरला आहे. ब्रूकने 310 बॉलमध्ये त्रिशतक केलं. याआधी वीरेंद्र सेहवागने 2004 साली पाकिस्तान विरुद्ध 364 बॉलमध्ये ट्रिपल सेंच्युरी केली होती. तसेच ब्रूकने सेहवागचा मुल्तानमधील सर्वाधिक धावांचा विक्रमही उद्धवस्त केला. सेहवागने मुलतानमध्ये 309 धावांची खेळी केली होती. तर ब्रूकने पाकिस्तान विरुद्ध 317 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान शतकांचा विक्रम हा वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. सेहवागने 2008 साली चेन्नईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 278 बॉलमध्ये हा कारनामा केला होता.

तसेच हॅरी ब्रूक इंग्लंडसाठी त्रिशतक करणारा सहावा फलंदाज ठरला आहे. ब्रूक आधी लेन ह्यूटन, वॅली हॅमंड, ग्राहम गूच, एंडी सँडम आणि जॉन एडरीच या 5 फलंदाजांनी ही कामगिरी केली होती.

हॅरी ब्रूकने असं पूर्ण केलं त्रिशतक

  • 49 चेंडूत अर्धशतक
  • 118 बॉलमध्ये शतक
  • 186 बॉलमध्ये 150 धावा
  • 245 बॉलमध्ये डबल सेंच्युरी
  • 281 चेंडूत 250 धावा
  • 310 बॉलमध्ये 300 धावा

इंग्लंडकडून 34 वर्षांनंतर कसोटी त्रिशतक

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि अबरार अहमद.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस एटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.