BAN vs WI : विंडिजच्या बाजूने नाणेफेकीचौ कौल, बांगलादेश विरुद्ध बॅटिंग की फिल्डिंग ?
GH News October 10, 2024 10:13 PM

आयसीसी वूमन्स टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 13 व्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील तिसरा सामना आहे. या सामन्याचं आयोजन हे शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजता टॉस झाला. वेस्ट इंडिजच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. विंडिजने फिल्डिंगचा निर्णय घेत बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. बांगलादेशने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर विंडिजकडून मँडी मंगरू हीला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

वेस्ट इंडिज वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हेली मॅथ्यूज (कॅप्टन), स्टॅफनी टेलर, कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेल (विकेटकीपर), डिआंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, आलिया ॲलेने, मँडी मंगरू, एफी फ्लेचर, अश्मिनी मुनिसार आणि करिश्मा रामहरक.

बांगलादेश वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : निगार सुलताना (कॅप्टन आणि विकेटकीपर), शथी राणी, दिलारा अक्टर, शोभना मोस्तरी, शोर्ना अक्टर, ताज नेहर, रितू मोनी, फहिमा खातून, राबेया खान, नाहिदा अक्टर आणि मारुफा अक्टर.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.