Goa News: सुभाष वेलिंगकर डिचोली पोलीस स्टेशनमधून रवाना
dainikgomantak October 11, 2024 04:45 AM
सुभाष वेलिंगकर पोलीस स्टेशनमधून रवाना

केवळ २० मिनिटांच्या चौकशीनंतर वेलिंगकर पोलीस स्टेशनमधून निघाले, मीडियाशी बोलण्यास दिला नकार.

डिचोली पोलीस स्थानकात वेलिंकरांची हजेरी...

सुभाष वेलिंगकर अखेर डिचोली पोलीस स्थानकात दाखल. वकीलासह दुपारी 4 वाजता डिचोली पोलिस स्थानकात हजेरी लावली. न्यायालयाच्या निर्देशानुसार वेलिंगकरांचे चौकशीसाठी सहकार्य. वेलिंगकरांची जबानी घेण्याचे काम सुरु. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांची उपस्थिती.

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता!!

गोवा सरकारने 25 ऑक्टोबर रोजी राजपत्रित आणि अराजपत्रित कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते तसेच निवृत्तीवेतनधारक आणि स्वातंत्र्य सैनिकांचे निवृत्तीवेतन वितरित करण्याचा आदेश जारी केला आहे.

NH-748 AA वरील वाहतुकीवर निर्बंध

साखळी पुलंबवरून चोरला घाटाद्वारे गोव्याच्या सिमीकडे जाणाऱ्या 3.50 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या वाहनांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती PWD पणजी विभागाकडून जारी करण्यात आली आहे.

दसऱ्याच्या दिवशी झेंडूची फुलं महागणार?

झेंडू फुलांचा भाव वाढला. डिचोलीत झेंडू फुलांची आवक घटल्याने दसऱ्याला फूले महागण्याचे संकेत मिळत आहेत. राज्यात पावसाच्या कहरामुळे झेंडू फुलांच्या बहरावर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.

राहिलेल्यांनी भाडेकरू पडताळणी नोंदणी लवकर करून घ्यावी...

भाडेकरू पडताळणीची मुदत आज संपुष्टात येत असली तरी राहिलेल्यांनी येत्या ४ ते ५ दिवसांत नोंदणी करून घ्यावी. त्यानंतर मात्र कोणाचीही गय केली जाणार नाही. पोलीस थेट दंडात्मक कारवाई करणार. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन.

वेलिंगकर कोर्टात हजर होणार!!

सुभाष वेलिंगकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 15 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पोलिसांच्या तिसऱ्या नोटीसनंतर हायकोर्टाने त्यांना आज संध्याकाळी 5 वाजता कोर्टासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले. वेलिंगकरसाठी आनंदाची बातमी म्हणजे त्यांनी या नोटीसचे पालन केल्यास त्यांना अटक केली जाणार नाही. सुभाष वेलिंगकर हे डिचोली पोलिसांसमोर हजर होणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला दिली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.