Solapur congress mp praniti shinde angry on bjp leader devendra fadnavis urk
Marathi October 11, 2024 07:24 AM


सोलापूर – सोलापूरमध्ये झालेल्या लाडकी बहीण योजना वचनपुर्ती सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेली लाडकी बहीण उल्लेख करत टीका केली होती. त्याला खासदार प्रणिती शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.हीच तुमची लाडकी बहीण गोरगरीब महिला, कामगार यांच्यासाठी तुमच्यासमोर उभे राहून काम करत आहे, असा टोला लगावला आहे.

काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

वचनपूर्ती सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी डीपीडीसीमधून सहा कोटी रुपये घेण्यात आले. एसी, कुलर, पंख्यासाठी हा निधी वापरण्यात आल्याचा आरोप खासदार शिंदेंनी केला.

– Advertisement –

पन्नास खोके गॅंगचे शिलेदार – खासदार प्रणिती शिंदे

खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, एकीकडे प्रसूतीगृहात साधनसामग्री नाही, उमेद अभियानासाठी पैसे नाहीत. मात्र लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी डीपीडीसी मधून सहा कोटी रुपये घेण्यात आले आहेत. गावागावातून महिलांना आणण्यासाठी प्रशासनावर प्रचंड दबाव टाकला गेला. 50 खोके गॅंगचे शिलेदार काल बोलले, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत. मात्र हीच तुमची लाडकी बहीण गोरगरीब महिला, कामगार यांच्यासाठी तुमच्यासमोर उभे राहून काम करत आहे, असा टोला फडणवीसांना लगावला.

भाजपची स्ट्रॅटेजी फेल, लवकरच जातीधर्मावर येणार 

खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, एक महिला तुमचा पराभव करते तेव्हा भाजपवाले खरंच संतापतात. तिथे मात्र लाडक्या बहिणींचा कुठलाही मान सन्मान ठेवत नाहीत. काल सत्ताधारी मंडळी खरं बोलले की पैसे देऊन प्रेम विकत घेता येत नाही. हे खरेच आहे की, दीड हजार रुपये देऊन लाडक्या बहिणीचे प्रेम विकत घेता येणार नाही. वचनपूर्तीसाठी आतापर्यंत ढोल ताशांचा वापर करणारे तोंडावर पडणार आहेत, यांची वचनपूर्ती खोटी ठरणार आहे, असेही खासदार शिंदे म्हणाल्या.

– Advertisement –

प्रणिती शिंदे म्हणाल्या की काल लाडकी बहीण म्हणणारे पुढील एक-दोन आठवड्यामध्ये पुन्हा एकदा जाती-धर्मावर, जातपाती वरती येणार आहेत. कारण त्यांनी ठरवलेली स्ट्रॅटजी फेल जाणार आहे. आगामी दिवसांमध्ये महाविकास आघाडी ही महायुती विरोधात लढणार आणि महाविकास आघाडी एक स्थिर सरकार राज्याला देणार, असेही शिंदे म्हणाल्या.

हेही वाचा : Maratha Quota : राज्य सरकारच्या या निर्णयाने मनोज जरांगे संतप्त; म्हणाले, आता विरोधकांचे ना हरकत घेतले होते का?

Edite by – Unmesh Khandale



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.