Pankaja gopinath munde and dhananjay munde on one stage on dasara melava beed urk
Marathi October 11, 2024 06:25 AM


बीड – बीडमधील मुंडे बहीण – भावातील वैर आता संपुष्टात आले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी चुलत बहीण पंकजा मुंडे यांचा प्रचार केला होता. मात्र त्यांचा पराभव झाला होता. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा मुंडे बहीण-भाऊ एकत्र येणार आहेत. बीडमधील प्रसिद्ध भगवान भक्ती गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात एका दशकानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र येणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंडे बहीण-भाऊ एकत्र दिसणार असल्यामुळे एक प्रकारे महायुतीचे हे शक्तीप्रदर्शनही असणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पवार कुटुंबातील फुटीनंतर मुंडे बहीण-भाऊ एकत्र 

राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे तब्बल 12 वर्षांनंतर भगवानगडावरील दसरा मेळाव्यात एकत्र येणार आहेत. धनंजय मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात जाऊन गोपीनाथ मुंडेंनी आयुष्यभर ज्या शरद पवारांना विरोध केला, त्यांच्याच सोबत जाण्याची भूमिका धनंजय मुंडेंनी घेतली होती. त्या भूमिकेनंतर मुंडे घराण्यात फुट पडली होती. त्यानंतर गोपीनाथ मुंडेंचं 2014 साली निधन झालं. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा पंकजा मुंडेंनी पुढे चालू ठेवत सावरगाव येथील भगवान भक्तीगटावर दसरा मेळवा सुरु ठेवला होता.

– Advertisement –

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पाडत 40 आमदारांचा गट घेऊन महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पुन्हा एकत्रित आले. परळी मतदारसंघावरचा दावाही पंकजा मुंडे यांनी सोडला आणि त्यांची वर्णी विधान परिषदेवर लागली आहे.

असा आला नात्यात दुरावा… 

धनंजय मुंडे काका गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाले आणि राजकारणात आले. 2009 मध्ये परळी विधानसभेची उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा धनंजय मुंडेंना होती. मात्र त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर केली आणि एक प्रकारे आपला राजकीय वारस म्हणूनही पंकजा यांची घोषणा केली. इथूनच धनंजय मुंडे यांच्या मनामध्ये काका आणि चुलत बहिणीबद्दल नाराजीला सुरुवात झाली. नाराज झालेल्या धनंजय मुंडे यांनी भाजपचे पारंपरिक विरोधक शरद पवार यांच्यासोबत जाऊन काका गोपीनाथ मुंडेंना मोठा धक्का दिला होता. 2012 मध्ये आधी वडील पंडित मुंडे आणि त्यानंतर 2013 मध्ये स्वतः धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून 2023 पर्यंत मुंडे-बहीण भावाचे राजकीय मार्ग वेगळे होते आणि नात्यातही वितुष्ट आले होते.

– Advertisement –

हेही वाचा : Congress Vs BJP : प्रणिती शिंदे भडकल्या; वाचा, कोणाला म्हणाल्या पन्नास खोके गॅंगचे शिलेदार

Edited by – Unmesh Khandale





Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.