Navi Mumbai AirPort : नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी यशस्वी; हवाई दलाच्या विमानांची उंच भरारी
GH News October 11, 2024 03:13 PM

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवरून आज वायूदलाचं लढाऊ विमानाद्वारे चाचणी करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी नवी मुंबई विमानतळाची चाचणी घेण्यात येत असून नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवरून वायूदलाचं लढाऊ विमान उड्डाण घेणार आहे. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात कऱण्यात आला आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सिडकोच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. मार्च २०२५ पर्यंत देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. तर त्यापैकी एका धावपट्टीचं काम पूर्ण झालं असून याच धावपट्टीवरून वायू दलाच्या ताफ्यातील सी- 130 तर हवाई दलाचं सुखोई हे लढाऊ विमान देखील या धावपट्टीवरून उड्डाण करत आहे. यासह भारतीय हवाई दलाचे विमान IAF C-295 धावपट्टीवर चाचणीसाठी विमानतळावर उतरले. लँण्डींग पूर्वी विमानाने आकाशात सात ते आठ घिरट्या घातल्या. त्यानंतर नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर विमानाची यशस्वी लॅण्डींग झाले. हे विमान धावपट्टीवर उतरताच त्याला ‘वॉटर सॅल्यूट’ करण्यात आले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.