टीम इंडियाच्या टी20 संघात या तिघांना दार बंद! झालं असं की..
GH News October 11, 2024 07:15 PM

बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. सूर्यकुमार यादव काही नव्या चेहऱ्यांसह मैदानात उतरला आहे. तरीही भारतान या संघात नितीश रेड्डी आणि मंयक यादव यांच्यासारखे नवे चेहरे आहेत. या खेळाडूंनी आपली छाप टी20 मालिकेत पार पडली आहे. नवोदित खेळाडूंच्या कामगिरी पाहता भविष्यात त्यांचं संघातील स्थान निश्चित असल्याचं दिसत आहे. त्यामुळे काही प्रमुख खेळाडूंचा टी20 संघातून पत्ता कापला जाऊ शकतो, असं क्रीडारसिकांचं म्हणणं आहे. खरं तर त्यांना पुन्हा टी20 संघात स्थान मिळणं खूपच कठीण दिसत आहे. त्यांना आता वनडे आणि कसोटी फॉर्मेटवरच लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे. या यादीत तीन खेळाडू आहेत. चला त्यांच्याबाबत जाणून घेऊयात

शार्दुल ठाकुर: वेगवान गोलंदाज आणि वेळेप्रसंगी फलंदाजी करणाऱ्या शार्दुल ठाकुरचे टी20 संघाचे दरवाजे जवळपास बंद झाले आहेत. कारण गेल्या अडीच वर्षांपासून तो टी20 संघाचा भाग नाही. फेब्रुवारी 2022 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा टी20 सामना खेळला होता. 32 वर्षीय शार्दुल टी20 संघात खेळून बराच काळ लोटला आहे. त्यामुळे आता संघात स्थान मिळणं कठीण दिसत आहे. शार्दुलने आतापर्यंत 25 टी20 सामने खेळले असून केवळ 33 विकेट्स घेतल्या आहेत.

श्रेयस अय्यर : श्रेयस टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी झगडत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याची हवी तशी छाप पडलेली नाही. तसेच टी20 क्रिकेटमध्ये त्याचा स्ट्राईक रेट कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. आतापर्यंत मिळालेल्या संधीचं त्याला सोनं करता आलं नाही. श्रेयस अय्यर डिसेंबर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा टी20 सामना खेळला होता. श्रेयसने 51 टी20 सामन्यात 1104 धावा केल्या आहेत. त्याने यात 8 अर्धशतकं झळकावली आहेत.

केएल राहुल : केएल राहुललाही टी20 संघात स्थान मिळताना दिसत नाही. आयपीएलमध्येही त्याच्या फलंदाजीची हवी तशी छाप पडली नाही. त्यामुळे टी20 वर्ल्डकप संघात निवड झाली नाही. त्यामुळे केएल राहुलने कसोटी आणि वनडे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केल्याचं दिसत आहे. केएल राहुलने 72 टी20 सामन्यात 37.75 च्या सरासरीने 2265 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि 22 अर्धशतकं झळकावली आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.