शाहरुख खान आणि गौरी खानची लाडकी सुहाना खानने 'द आर्चिज' या चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण केले आहे. हा चित्रपट OTT वर प्रदर्शित झाला आहे. लवकरच सुहाना मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मोठ्या पडद्यावर झळकणाऱ्या चित्रपटात ती बॉलीवूडचे किंग खान शाहरुख खान म्हणजेच तिचे वडील शाहरुख खानसोबत काम करताना दिसणार आहे. हा चित्रपटाचे नाव 'किंग' आहे. यासाठी सुहानाने तयारी करताना दिसत आहे.आजकाल तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सुहाना घाम गाळताना आणि जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे.सुहाना खानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री तीव्र कसरत करताना दिसत आहे. जड वजन उचलून ही अभिनेत्री जिममध्ये घाम गाळत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी सुहानाला पहिल्यांदाच एवढी भारी कसरत करताना पाहिले आहे.
बॉलिवूड सुपरस्टारशाहरुख खानची मुलगी आणि अभिनेत्री सुहाना खानने अखेर तिच्या परफेक्ट फिट फिगरचे रहस्य उघड केले आहे.सुहाना खानने स्वतः तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून वर्कआउटचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओमध्ये ती जोरदार व्यायाम करताना दिसत आहे, ज्यात पुल-अप्स आणि वजन उचलणे यासारख्या व्यायामांचा समावेश आहे. हा व्हिडिओ 'किंग' चित्रपटासाठी तिने केलेल्या कष्टांवर प्रकाश टाकत आहे. सुहाना किंग या चित्रपटासाठी जोरदार मेहनत करत आहे.आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसोबत जिम मध्ये घाम काढताना सुहाना दिसत आहे.
View this post on Instagram
सुहानाच्या व्हायरल व्हिडिओवर चहात्यांच्या प्रतिक्रिया
सुहानाच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. तिच्या जिमच्या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'आरोग्यसोबत सौंदर्य.' तर दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये सुहानाचे कौतुक केले आणि लिहिले, 'आश्चर्यकारक, हे फिटनेसचे रहस्य आहे, परंतु प्रत्येकासाठी खूप महत्वाचे आहे. तर ' एका यूजरने लिहिले की, 'स्ट्राँग गर्ल.'तर अनेकांनी तिला विचारला आहे की तू इतकं हेवी वर्कआउट का करत आहे.
किंग 2026 मध्ये रिलीज होणार आहेView this post on Instagram
किंग या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट 2025 मध्ये मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. चित्रपटाचे बरेचसे शूटिंग युरोपमध्ये होणार आहे. सुजॉय घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. गौरी खान आणि सिद्धार्थ आनंद हे त्याचे निर्माते आहेत. या सिनेमात शाहरुख आणि सुहानासोबत अभिषेक बच्चन, अभय वर्मा हे कलाकारही दिसणार आहेत.या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन जो मुख्य खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट 2026 च्या ईदला प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर सुहाना खान या चित्रपटात तिच्या वडिलांसोबत म्हणजेच शाहरुख खान सोबत ॲक्शन सीन करताना दिसणार आहे असे देखील सूत्राने सांगितले आहे.
शाहरुख खान-गौरी खान हे तीन मुलांचे पालक आहेत. 1997 मध्ये त्यांचा मुलगा आर्यनचा जन्म झाला. तीन वर्षांनंतर मुलगी सुहानाचा जन्म झाला. पॉवर दाम्पत्याने 2013 मध्ये सरोगसीद्वारे मुलगा अबरामचे कुटुंबात स्वागत केले.