डोंबिवली मध्ये लोकल ट्रेनमधून पडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू
Webdunia Marathi October 16, 2024 02:45 PM

गर्दीमुळे चालत्या लोकलमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. तसेच प्रचंड गर्दीमुळे तो डोंबिवली ते कोपर दरम्यान लोकलमधून पडून गंभीर जखमी झाला आणि त्याला वाचवता आले नाही. या घटनेमुळे डोंबिळवीतील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गर्दीमुळे चालत्या लोकलमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे.

आयुष दोशी असे या तरुणाचे नाव असून, आयुषच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, या वर्षभरात गर्दीमुळे अनेक तरुणांचा मृत्यू झाल्याने डोंबिवलीतील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.