Nagpur Tigress Fight:सोशल मीडियावर सध्या नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात व्याघ्र प्रकल्पात आलेल्या पर्यटकांना दोन वाघिणींमध्ये घडलेली झुंज पाहण्यास मिळाली आहे. सोशल मीडियावर सध्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
(Viral) होत असलेल्या (Video) तुम्हाला पेंच व्याघ्र प्रकल्पातील संपूर्ण परिसर दिसून येत आहे. यामध्ये एक जीप दिसत आहे ज्यात काही पर्यटक पेंच व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी आणि या प्रकल्पातील वाघांना पाहण्यासाठी आलेले आहेत. मात्र काही वेळात या पर्यटकांना दोन वाघिण पाहण्यासाठी मिळतात मात्र अवघ्या काही क्षणात दोन वाघिणींमध्ये जोरदार झुंज होताना दिसून येत आहे. संपूर्ण झुंजीचा थरार काही पर्यटक कॅमेऱ्यात कैद होताना दिसून येत आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिआ प्लॅटफॉर्मवर शेअर करत ''@saamtvnews'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. व्हिडिओ कधीचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक यूजर्संच्या पसंतीस पडलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत,''Pench National Park येथे दोन वाघांची झुंज'' असे कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलेले आहे.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.