बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ, गॅलेक्सीबाहेर कडेकोट बंदोबस्त
GH News October 16, 2024 03:12 PM

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गाटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी हत्या झाली. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्याकांडाची जबाबदारी घेतली. त्यानंतर अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सलमान रहात असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सलमानच्या सुरक्षेसाठी जवळपासा 100 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यापैकी काही जण सिव्हिल ड्रेसमध्येही आहेत. सलमानच्या घराबाहेर असलेली कार स्क्वॉडची आहे. तसेच त्याच्या घराबाहेर जवळपास 24 तास पोलीस तैनात असतात. सीसीटीव्हीच्या मदतीने येथील
सुरक्षेवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

बँडस्टँड आणि गॅलेक्सी अपार्टमेंट्सजवळ 60 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी सामान्य कपड्यांमध्ये तैनात आहेत. या भागात कोणतीही संशयास्पद घटना किंवा व्यक्ती आढळते का, यावर त्यांचं लक्ष आहे. बाबा सिद्दीकी यांचं सलमान खानशी खूप जवळचं नातं होतं. दोघांची अनेक वर्षांपासून गाढ मैत्री होती. मात्र त्याच मैत्रीमुळे सिद्दीकी यांना टार्गेट करण्यात आलं का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणी आत्तापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली असून अनेक महत्वाचे खुलासे होतील

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.