मराठी मनोरंजन सृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi ) हिचा 13 ऑक्टोबरला वाढदिवस होता. स्पृहा 35 वर्षाची झाली आहे. स्पृहाने अनेक नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिज यांच्यामध्ये काम केलं आहे. तसेच ती उत्कृष्ट निवेदिका आणि कवियत्री आहे. तिच्या वाढदिवसाला चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून भरपूर प्रेमाचा वर्षाव झाला. तिला अनेक शुभेच्छा मिळाल्या. याचे आभार मानण्यासाठी स्पृहाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली आहे. जी वाचून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील.
आपल्या सोशल मीडियावर तिच्या आई-वडिलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यात तिचे आई-बाबा रुग्णालयातील दाखल असल्याचे समजून येत आहे. स्पृहाने एक तिचा फोटो आणि रुग्णालयातील फोटो असे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत स्पृहाने एक खास कॅप्शन आपल्या पोस्टला दिलं आहे. तिने लिहिलं की, "१३ ऑक्टोबरला झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अजून येत आहेत.. आई बाबांची तब्येत सुधारते आहे.. @jupiterhospital Baner Pune .. त्यांची आणि पेशंटच्या नातेवाईकांची प्रेमाने काळजी घेत आहेत.. सगळे स्नेही, आप्तेष्ट, मित्र "काहीही लागलं तरी सांग" म्हणून दिलासा देतायत.. इतकी माणसं जोडलेली असणं ही त्या दोघांची पुण्याई आहे..."
पुढे स्पृहा म्हणते की, आपल्यावर करणारी इतकी माणसं आहेत, ही भावना फार मन भरून टाकणारी आहे. तुम्हा सगळ्यांची ऋणी आहे. प्रत्येकाला उत्तर देणं जमलं नाही.. रागावू नका .. लोभ आहेच, तो वाढत राहो ..अशा भावुक शब्दात तिने आपले मन मोकळ केलं आहे.
स्पृहाच्या या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. तसेच आई बाबांसाठी काळजी देखील व्यक्त केली आहे. सध्या स्पृहा 'संकर्षण व्हाया स्पृहा' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्य भेटीला येत आहे.