Latest Maharashtra News Updates : 'दम असेल तर समोर येऊन लढा ' - पटोले
esakal October 18, 2024 06:45 PM
'दम असेल तर समोर येऊन लढा ' - पटोले

'दम असेल तर समोर येऊन लढा ' असे पटोले म्हणाले आहे.

नायब सिंग सैनी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला

भाजपचे नायब सिंग सैनी यांनी चंदीगड येथील हरियाणा नागरी सचिवालयात हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे.

रायगडमध्ये उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

एकूण रुपये २ लाख ७१ हजार ४२५ इतका मुद्देमाल जप्त झाला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. एकूण रुपये २ लाख ७१ हजार ४२५ इतका मुद्देमाल जप्त Maharashtra Assembly MVA List LIVE : जागावाटपाबाबत काँग्रेस नेते काय म्हणाले?

महाराष्ट्र निवडणुकीच्या जागावाटपाबाबत काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले, जेव्हा पक्षांमध्ये जागा वाटल्या जातात, तेव्हा असे टप्पे येतात, परंतु प्रत्येक वेळी आम्ही हे टप्पे एकत्र पार करतो, यावेळीही आम्ही तसे करत आहोत. आमच्यात संवाद आहे, कधी कधी असे होते की दोन्ही पक्षांना एकच सीट हवी असते, मग संवाद होतो आणि मार्ग सापडतो आणि आताही आम्ही मार्ग शोधत आहेत.

Online Fraud Live Updates: वाढत्या ऑनलाईन घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी सरकार आणि मेटा यांचा संयुक्त उपक्रम

वाढत्या ऑनलाईन घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी सरकार आणि मेटा यांचं संयुक्त "स्कॅम से बचावो" अभियान. वाढत्या ऑनलाईन आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याचं उद्देश

Mahayuti LIVE: चंदगड विधानसभेवरून महायुतीत रस्सीखेंच

चंदगड विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीतील स्थानिक राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. भाजपचे शिवाजी पाटील या मतदारसंघातून इच्छुक आहेत, तर सध्या अजित पवार गटाचे राजेश पाटील विद्यमान आमदार आहेत. या स्पर्धेत शिवाजी पाटील कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ताज्या घडामोडीत शिवाजी पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी तातडीने भेटीसाठी दाखल झाले आहेत, त्यामुळे या राजकीय संघर्षाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

Rajan Teli Live: राजन तेली यांचा आज ठाकरे गटात प्रवेश करणार

राजन तेली यांचा आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. राजन तेली यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. एकेकाळचे कट्टर समर्थक असलेल्या राजन तेली यांनी राणेंवर आरोप केले आहेत. राजीनामा पत्रात त्यांनी आरोप केले. राणे खच्चीकरण करत असल्याने राजीनामा देत असल्याचा पत्रात उल्लेख आहे.

CM Omar Abdullah Live Updates: जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर
  • जम्मू काश्मीर विधानसभेत महत्वाचा प्रस्ताव मंजूर

  • जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

  • उमर अब्दुल्ला सरकारने कॅबिनेट बैठकीत मंजूर केला प्रस्ताव

  • लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला जाणार- सूत्रांची माहिती

  • आम्ही सत्तेत आल्यास जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देऊ असं आश्वासन प्रचारावेळी नॅशनल कॉन्फरन्सने दिलं होतं.

Remo D'Souza LIVE : कोरिओग्राफर रेमो डिसोझावर मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेमो डिसोझासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ११ कोटी ९६ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. एका डान्स ग्रुपची फसवणूक केल्याप्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.

Farmers Association LIVE : शेतकरी संघटनांच्या आता 'चेतावनी सभा', केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप

नवी दिल्ली : पंजाबमधील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केल्याच्या घटनेला येत्या २६ नोव्हेंबर रोजी चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संयुक्त किसान मोर्चाने पाचशे जिल्ह्यांमध्ये चेतावणी सभांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढील वर्षी यापेक्षाही सर्वांत मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या संघटनांकडून देण्यात आला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली असल्याचा आरोप शेतकरी नेते हन्नन मौला यांनी केला आहे.

Actor Salman Khan LIVE : अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकीचा मेसेज; घराबाहेर वाढवली सुरक्षा

मुंबई : अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी मिळाल्यानंतर त्याच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांच्या व्हाॅट्सअपवर धमकीचा मेसेज आला आहे.

Maharashtra Assembly BJP List LIVE : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत १०० पेक्षा जास्त उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोणत्या आमदाराचा पत्त कट होणार, कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

Pandit Gadgil Passed Away LIVE : संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे निधन

संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ (वय ९५) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सकाळी ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.

Actor Salman Khan LIVE : अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी; वाहतूक पोलिसांच्या Whatsapp वर आला धमकीचा मेसेज

अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकीचा मेसेज आला आहे. वाहतूक पोलिसांच्या व्हाॅट्सअपवर धमकीचा मेसेज आला आहे. लॉरेन्स बिश्नोई सोबतच शत्रुत्व संपवण्यासाठी पाच कोटी रुपयांची मागणी केली. खंडणी न दिल्यास राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यापेक्षा वाईट अवस्था करण्याचा धमकीत उल्लेख आहे.

Aam Aadmi Party LIVE : महाराष्ट्रात 'आप' निवडणूक लढणार नाही

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तयारीसाठी ‘आप’चे सर्व नेते प्रचाराला लागले आहेत. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया दिल्लीत पदयात्रा काढून विधानसभा प्रचाराला सुरुवात केली आहे. या व्यग्रतेमुळे महाराष्ट्रातील निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

Sheikh Hasina LIVE : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांविरुद्ध अटक वॉरंट जारी

ढाका : बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि इतर ४५ जणांविरोधात अटक वॉरंट जारी केले आहेत. सध्या त्या भारतात आश्रयाला आहेत. बांगलादेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय लवादाचीही फेररचना झाली आहे. या नव्या लवादाचे आजच कामकाज सुरू झाले. कामाच्या पहिल्याच दिवशी लवादाने हसीना आणि त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात अटक वॉरंट जारी केले.

Assembly Elections LIVE : जागा वाटपाचा तिढा सुटणार? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद

Latest Marathi Live Updates 18 October 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद आहे. दुपारी 12 वाजता शिवालय येथे ही पत्रकार परिषद होत आहे. या शिवाय, महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटणार आहे. तसेच देशातील बालविवाहाच्या वाढत्या प्रकरणांशी संबंधित याचिकेवर सुप्रीम कोर्ट आज निकाल सुनावणार आहे. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे वेल्डिंगचे काम करणाऱ्या परमेश्वर यादव (रा. उत्तर प्रदेश) याला मालवण पोलिसांनी अटक केलीये. राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण असून पुढील दोन-तीन दिवस हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.