IND vs NZ : ऋषभ पंत न्यूझीलंड विरुद्ध बॅटिंग करणार की नाही? जाणून घ्या
GH News October 18, 2024 11:09 PM

टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीत सुरुवातीपासूनच बॅकफुटवर आहे. पहिल्या दिवस हा पावसामुळे वाया गेला. त्यानंतर दुसऱ्या टॉस जिंकल्यानंतर टीम इंडिया पहिल्या डावात 46 धावांवर ऑलआऊट झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याच्या शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्याला बॉल लागल्याने दुखापत झाली. पंतला या दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं होतं. तसेच त्याच्या जागी ध्रुव जुरेल हा विकेटकीपिंग करण्यासाठी आला. पंतला झालेल्या दुखापतीमुळे नियमानुसार त्याच्या जागी ध्रुव जुरेलला बॅटिंग करता येणार नाही. त्यामुळे पंत बॅटिंग करणार की नाही? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. याबाबत आपण जाणून घेऊयात.

पंतला दुखापतीमुळे दुसऱ्या दिवशी मैदान सोडावं लागलं. तर तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड ऑलआऊट होईपर्यंत ध्रुव जुरेलने विकेटकीपिंग केली. तर बॅटिंगमध्ये पंतची अजून वेळ आलेली नाही. मात्र तिसऱ्या दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओमुळे टीम इंडियाला आणि पर्यायाने भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ऋषभ पंतला दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाच्या बॉलिंगवर दुखापत झाली होती. जडेजाने टाकलेला बॉल हा पंतच्या शस्त्रक्रिया झालेल्या गुड्यावर जाऊन लागला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कॅप्टन रोहित शर्माने त्याबाबत माहिती दिली. पंतला जिथे बॉल लागलाय तिथे सूज आल्याचं रोहितने सांगितलं. मात्र पंत तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या बॅटिंगनंतर ब्रेकदरम्यान बॅटिंगची प्रॅक्टीस करत होता. पंतचा सराव करतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे पंत दुसऱ्या डावात बॅटिंगला येणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.

ऋषभ पंत बॅटिंगसाठी सज्ज

सामन्यात काय झालं?

टीम इंडिया पहिल्या डावात 46 धावावंर बाद झाली. न्यूझीलंडने प्रत्युत्तरात 402 धावा करत 356 भक्कम आघाडी घेतली. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 3 विकेट्स गमावून 231 धावा केल्या आहेत. मात्र अजूनही टीम इंडिया 125 धावांनी पिछाडीवर आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.