CRPF ट्रकचा अपघात, 12 जखमी
Marathi October 19, 2024 12:24 AM

न्यूज एजन्सी/श्रीनगर

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणारा ट्रक गुऊवारी मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील खैगाम भागात दरीत कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात 12 जवान जखमी झाल्याचे सांगण्यात आले. जखमींना उपचारासाठी जवळच्या ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक अधिकारी आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले होते. काश्मीरमध्ये यापूर्वीही लष्करी वाहनांना येथील घाटमार्गात अशाप्रकारे दुर्घटनांचा सामना करावा लागला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.