Share Market Closing: शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; निफ्टी 24,800च्या वर, निफ्टी बँकेत मोठी वाढ
esakal October 19, 2024 01:45 AM

Share Market Closing Latest Update 18 October 2024: शेअर बाजाराने आठवड्याचा शेवट हिरव्या रंगात केला आहे. सेन्सेक्स जवळपास 300 अंकांच्या वाढीसह बंद झाला. निफ्टी 100 हून अधिक अंकांच्या वाढीसह बंद झाला. बँक निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली.

निर्देशांक 800 हून अधिक अंकांच्या वाढीसह 52,122 वर बंद झाला. बाजाराची सुरुवात कमकुवत झाली होती, परंतु त्यानंतर बाजार थोडासा शांत झाल्याचे दिसले आणि बंद होईपर्यंत खालच्या पातळीपासून चांगली रिकव्हरीसह बंद झाले.

निफ्टी 104 अंकांनी वाढून 24,854 वर बंद झाला. सेन्सेक्स 218 अंकांनी वाढून 81,224 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 805 अंकांनी वाढून 52,094 वर बंद झाला.

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

बाजारातील ही वाढ बँकिंग स्टॉक्समुळे झाली आहे. निफ्टी बँक 805 अंकांच्या वाढीसह बंद झाला आहे. याशिवाय ऑटो सेक्टर, फार्मा सेक्टर, मेटल, रिअल इस्टेट, मीडिया, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर सेक्टरचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

घसरणाऱ्या क्षेत्रांपैकी सर्वात मोठी घसरण आयटी शेअर्समध्ये झाली आहे. निफ्टीचा आयटी निर्देशांक 627 अंकांनी घसरून बंद झाला. याशिवाय ऑइल आणि गॅस, एफएमसीजी शेअर्समध्येही विक्री दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये रिकव्हरी झाली.

निफ्टी शेअर्समध्ये शुक्रवारी सर्वात मोठी वाढ ऍक्सिस बँकेत 5.84 टक्के, विप्रो 3.57 टक्के, आयशर मोटर्स 2.94 टक्के, आयसीआयसीआय बँक 2.88 टक्के आणि श्रीराम फायनान्स 2.60 टक्क्यांनी वाढले. याशिवाय इन्फोसिस 4.57 टक्के, एशियन पेंट 2.32 टक्के, ब्रिटानिया 1.64 टक्के, नेस्ले इंडिया 1.17 टक्के आणि एचयूएल 0.83 टक्क्यांनी घसरले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.