आळे येथे विद्यार्थ्यांना 'स्पर्धा परीक्षार'वर मार्गदर्शन
esakal October 19, 2024 03:45 AM

आळेफाटा, ता. १८ : ‘‘सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला या स्पर्धेत उतरावेच लागेल, तेव्हाच स्वतःची प्रगती होईल,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते विठ्ठल कांगणे यांनी आळे या ठिकाणी केले.
आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, ज्युनिअर कॉलेज व बाळासाहेब जाधव महाविद्यालय तसेच रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुक्याचे आमदार अतुल बेनके होते. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रीतम काळे, रोटरी क्लब आळेफाटा सेंट्रलचे अध्यक्षा विद्या जाधव, सेक्रेटरी सोनाली गांधी उपाध्यक्ष सरिता पोखरणा, संस्थापक महावीर पोखरणा, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अजय कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सौरभ डोके, खजिनदार अरुण हुलवळे, मानद सचिव अर्जुन पाडेकर, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रदीप गुंजाळ, बाळासाहेब जाधव, भाऊ कुऱ्हाडे, किशोर कुऱ्हाडे, उल्हास सहाणे, बबनराव सहाणे, शिवाजी गुंजाळ, जीवन शिंदे, दिनेश सहाणे, बाबूराव कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, सम्राट कुऱ्हाडे, देविदास पाडेकर, कैलास शेळके, शांताराम कुऱ्हाडे, प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव, मुख्याध्यापक संदीप भवारी, प्रा. संजय वाकचौरे डॉ. रावसाहेब गरड, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलत असताना कांगणे यांनी ‘आजच्या इंटरनेटच्या जगात भरकटलेली तरुणाई तसेच स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची गरज व तयारी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच आमदार बेनके यांनी नव्याने जुन्नर तालुक्यात बांधण्यात येणाऱ्या क्रीडा संकुल याविषयी माहिती दिली व त्यातून ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी नव्याने निर्माण होणाऱ्या संधी बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक किशोर कुऱ्हाडे यांनी केले. प्रा. अरविंद कुटे यांनी सूत्रसंचालन केले. ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे खजिनदार अरुण हुलवळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या अखेरीस दिवंगत रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.