Sakal Vidya : सकाळ विद्या, मोशनतर्फे उद्या बारामतीत सेमिनार
esakal October 19, 2024 05:45 AM

बारामती - दहावीच्या परीक्षेला सामोरे जाताना उपलब्ध वेळेत परिपूर्ण उत्तरपत्रिका कशी लिहावी, चांगले गुण संपादन करण्यासाठी कोणत्या बाबींचा अवलंब करावा, आकलनशक्ती कशी वाढवावी, याबाबत सखोल मार्गदर्शन सकाळ विद्या व मोशन अॅकॅडमीच्यावतीने आयोजित सेमिनारमध्ये केले जाणार आहे.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. अ. ल. देशमुख, विद्यार्थी व पालकांना परीक्षेला सामोरे जाताना कशा पद्धतीने अभ्यासाची पध्दत ठेवावी, याच्या उपयुक्त टिप्स या सेमिनार दरम्यान देणार आहेत. विविध क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी आहेत, दहावीनंतर उज्वल भवितव्यासाठी कोणते करिअर निवडायचे तसेच जेईई, नीटबाबत परिपूर्ण मार्गदर्शन नीरजकुमार करणार आहेत.

येत्या रविवारी (ता. २०) विद्यार्थी व पालकांसाठी करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित करणार आहे.

दहावीच्या परीक्षेत उत्तम गुण कसे मिळवावेत, उत्तरपत्रिका कशी लिहावी, कोणत्या भागाला जास्त महत्व द्यायचे यासह अनेक टीप्स या सेमिनारमध्ये मिळणार आहेत. दहावीनंतरच्या करिअरच्या संधीबाबतही याच दरम्यान मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थी व पालक यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असा हा कार्यक्रम असून अधिकाधिक विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी यास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चर्चासत्रातील काही मुद्दे

  • दहावीनंतर उच्च शिक्षण कुठून व कोणत्या विषयात घ्यायचे.

  • करिअरबाबत संभ्रम कसा दूर करता येईल

  • करिअरच्या वाटा, संधी कोणकोणत्या

  • विज्ञान क्षेत्रातील करिअरबद्दल विशेष मार्गदर्शन

  • जेईई, सीईटी, नीट यासह सर्व प्रकारच्या प्रवेश परीक्षांबद्दल सविस्तर मार्गदर्शन.

वक्ते -

  • प्रा. अ.ल. देशमुख, पुणे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

  • नीरज कुमार, मार्गदर्शक जेईई व नीट.

काय- कधी- केव्हा- कुठे

  • काय- दहावीनंतर करिअर निवड मार्गदर्शन

  • कधी- रविवार २० ऑक्टोबर २०२४

  • केव्हा- सकाळी १० वाजता

  • कुठे- मुक्ताई लॉन्स, सिटी इन चौक, सूर्यनगरी, भिगवणरोड, बारामती.

  • संपर्क- ८९७५६७३३१०.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.