Mhada Lottery Pune 2024: पुण्यात म्हाडाच्या घरासाठी असा करा ऑनलाईन अर्ज, तयार ठेवा ही कादपत्रे
Times Now Marathi October 19, 2024 05:45 AM

Mhada Lottery Pune 2024 : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (Mhada) शहरातील घरांच्या विक्रीसाठी ऑनलाइन लॉटरी जाहीर केली आहे. पुण्यात बजेटमध्ये घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सदनिकांचा या ऑनलाईन लॉटरीत समावेश करण्यात आला आहे. या साठी नोंदणी प्रक्रिया आणि अर्जाची प्रक्रिया गुरुवारी 10 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली आहे. तुम्ही देखील या लॉटरीसाठी अर्ज करणार असाल तर त्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत आणि अर्ज कसा करायचा हे जाणून घ्या.

अर्जदारासाठी आवश्यक पात्रता
  • पुणे म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
  • अर्जदाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
  • तुमच्या वार्षिक उत्पन्न गटानुसार तुम्ही विविध श्रेणीतील घरांसाठी अर्ज करू शकता.






म्हाडाच्या घरांसाठी उत्पन्न गटाचा तपशील
अल्प उत्पन्न गट (एलआयजी) : अर्जदाराचे मासिक उत्पन्न 25,001 रुपये आणि 50,000 रुपयांदरम्यान असावे.
मध्यम उत्पन्न गट (एमआयजी): अर्जदाराचे मासिक उत्पन्न 50,001 रुपये आणि 75,000 रुपयांदरम्यान असावे.
उच्च उत्पन्न गट (एचआयजी): अर्जदाराचे मासिक उत्पन्न 75,000 रुपये किंवा त्याहून अधिक असल्यास तो उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतो.


सिडको लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • उत्पन्नाचा दाखला
  • मतदार ओळखपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटोज
  • जन्म प्रमाणपत्र
  • अर्जदारांचे संपर्क तपशील
  • बँक तपशील




म्हाडा अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
  • सर्वप्रथम म्हाडाची अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in ला भेट द्या.
  • नोंदणी करा विभागात जाऊन खाते तयार करण्यासाठी 'Register' पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर यूजरनेम पेज नेले जाईल, तेथे एक Username निवडा आणि पासवर्ड तयार करा.
  • समोर आलेल्या तक्त्यात तुमची सर्व आवश्यक माहिती भरा आणि अर्ज पूर्ण करा.
  • यानंतर तुम्हाला मोबाइल क्रमांक पडताळणी करावी लागेल.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुमचा सुरू असलेला मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा.
  • सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज पुन्हा एकदा पडताळून पाहा.
  • सर्व माहिती पडताळून झाल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट करा.
  • तुम्ही निवडलेल्या उत्पन्न गटानुसार नोंदणी शुल्क भरा.
  • ऑनलाइन बँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्डचा वापर करून तुम्ही पेमेंट करू शकता.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घ्या आणि पुढील संदर्भासाठी तुमच्याकडे ठेवा.


अर्जदारांना म्हाडाकडून महत्त्वाचे आवाहन
गृहनिर्माण अर्जांशी संबंधित फसवणुकीच्या असंख्य अहवालानंतर म्हाडाने संभाव्य गृहखरेदीदारांना इशारा दिला आहे. म्हाडाच्या बनावट वेबसाईट आणि फसव्या योजनांमुळे अनेकांची फसवणूक झाली असून त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे. सदनिकांच्या विक्रीसाठी किंवा संबंधित कामांसाठी कोणत्याही दलालांना अधिकृत करण्यात आलेले नाही. अशा घटना टाळण्यासाठी घर खरेदीदारांनी अनधिकृत व्यक्तींसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार टाळण्याचे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.