'या' कारणामुळे शाहरुख खानसोबत 17 वर्ष वैर, 'डर' चित्रपटाच्या सेटवर सनी देओलचं तांडव; नेमकं काय घडलं?
नामदेव जगताप October 19, 2024 08:43 AM

Happy Birthday Sunny Deol : चित्रपटांमध्ये दमदार ॲक्शन सीन्स देणाऱ्या अभिनेता सनी देओलचा 'ढाई किलोचा हात' हा डालॉग खूप फेमस आहे. आज 18 ऑक्टोबर रोजी अभिनेता सनी देओलचा 66 वा वाढदिवस आहे. दमदार अभिनय आण डायलॉगबाजीच्या जोरावर सनी देओलने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण, स्टार किड असूनही सनी देओलसाठी फिल्म इंडस्ट्रीची वाट सोपी नव्हती.

हॅप्पी बर्थडे सनी देओल

सनी देओल वडिलांचा आज्ञाधारी मुलगा, बॉबी देओलचा आदर्शवादी मोठा भाऊ, प्रेमळ नवरा आणि बाबा असण्यासोबतच एक कंम्पिट फॅमिली मॅन आहे. देओल कौटुंबिक चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहिली आहे. सनी देओलचे वडील धर्मेंद्र यांनी दोन वेळा लग्न केलं. त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्यापासून त्यांना सनी देओल, बॉबी देओल, अजिता आणि विजेता ही चार मुले आहेत.

सनी देओलचं खरं नाव काय?

सनी देओलचा जन्म 19 ऑक्टोबर 1957 रोजी पंजाबच्या लुधियाणामध्ये झाला. सनी देओलचे खरे नाव अजय देओल आहे. शाळेत असताना सनी हे त्याचं टोपणनाव होतं. फिल्म इंडस्ट्रीमध्येही त्याने तेच नाव वापरलं. सनी देओलने बॉलिवूड इंडस्ट्रीमधील करिअरची सुरुवात1983 मध्ये अभिनेत्री अमृता सिंहसोबत बेताब या चित्रपटातून केली.

सनी देओलचा 90 च्या दशकात बोलबाला

90 च्या दशकात सनी देओलचा बोलबाला होता, त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ॲक्शन हिरो अशी सनीची ओळख बनली, ज्याला टक्कर देणं त्याकाळात कुणाला जमलं नाही.  सनीला अभिनयाची फार आवड होती. त्याला वडीलांसारखं सुपरस्टार व्हायचं होतं. यासाठी त्याने परदेशात जाऊन शिक्षण घेतलं. सनी देओलने बर्मिंघममध्ये ओल्ड वर्ल्ड थिएटरमधून ॲक्टिंगचे धडे गिरवले. बेताब चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

'डर' चित्रपटामुळे स्टारडमवर परिणाम

सनी देओलचा स्टारडम शिखरावर असताना त्याला यश चोप्राच्या 'डर' चित्रपटाची ऑफर आली. डर चित्रपटात तो नायक होता आणि शाहरुख खान खलनायक होता. त्यावेळी किंग खानला इंडस्ट्रीत येऊन फार वेळ झाला नव्हता आणि सनीची लोकप्रियताही जास्त होती. जसजसं चित्रपटाचं शूटिंग पुढे जात होतं तसतसं नायकापेक्षा खलनायकाला जास्त स्क्रीन टाईम असल्याची काळजी सनी देओलला वाटू लागली. 

'या' कारणामुळे शाहरुख खानसोबत 17 वर्ष वैर

डर चित्रपट रिलीज झाल्यानंतर ज्याची सनी देओलला भीती वात होती, तेच घडलं. चित्रपटात खलनायकाची भूमिका करूनही शाहरुख खानला सनी देओलपेक्षा जास्त लोकप्रियता मिळाली. यामुळे सनी देओल इतका संतापला होता की, त्याने यापुढे यश चोप्रासोबत काम करणार नाही, अशी शपथ घेतली. याचं मुद्द्यावरून सनीचा राग एकदा अनावर झाला आणि त्याचं शाहरुखसोबत जोरदार भांडण झालं होतं. या भांडणामुळे दोन्ही स्टार्स 16 वर्षांपासून एकमेकांशी बोलत नव्हते.

Bigg Boss 18 : सलमान खानच्या जीवाला धोका, बिश्नोई गँगच्या धमकीमुळे 'वीकेंड का वार'चं शूटींग रद्द?

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.