IND vs NZ : 1 मालिका, 3 सामने आणि 16 खेळाडू, वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा
GH News October 18, 2024 11:09 PM

टीम इंडिया सध्या मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. उभयसंघात एकूण 3 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. वूमन्स न्यूझीलंड क्रिकेट टीम आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीत पोहचली आहे. या स्पर्धेनंतर वूमन्स न्यूझीलंड टीमही भारत दौऱ्यावर येणार आहे. न्यूझीलंड या भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय निवड समितीने 16 सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे. या मालिकेत हरमनप्रीत कौर हीच नेतृत्व करणार आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात टीम इंडियाचं टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान हे साखळी फेरीतच संपुष्टात आलं. त्यानंतर हरमनप्रीत कौरचं कर्णधारपद काढून घेणार असल्याची चर्चा होती. मात्र टीम मॅनेजमेंटने हरमनप्रीतवर विश्वास दाखवत तिलाच कर्णधार ठेवलं आहे. तर स्मृती मानधना हीच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच प्रिया मिश्रा,साईमा ठाकुर आणि तेजल हसबनीस यांची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. तर ऋचा घोष हीला वैयक्तिक कारणामुळे विश्रांती देण्यात आली आहे. तसेच दुखापतीमुळे आशा शोभना आणि पूजा वस्त्राकार या दोघींचा समावेश करण्यात आलेला नाही.

या मालिकेतील तिन्ही सामन्याचं आयोजन हे एकाच मैदानात करण्यात आलं आहे. हे सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंचा प्रवासाच्या त्रासातून मुक्तता झाली आहे. त्यामुळे खेळाडूंना सरावासाठी अधिक वेळ देता येणार आहे. मालिकेला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 29 ऑक्टोबरला तिसरा आणि अंतिम सामना होईल. तर दुसरा सामना हा 27 ऑक्टोबरला पार पडणार आहे.

वूम्नस टीम इंडियाची घोषणा

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 24 ऑक्टोबर, दुपारी दीड वाजता

दुसरा सामना, 27 ऑक्टोबर, दुपारी दीड वाजता

तिसरा सामना, 29 ऑक्टोबर, दुपारी दीड वाजता

न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी वूमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृति मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, डी हेमलता, दीप्ति शर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), सायली सातघरे, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, तेजल हसबनीस, साइमा ठाकोर, प्रिया मिश्रा, राधा यादव, श्रेयांका पाटील.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.