WTC 2025 Points Table; पाकिस्तानची आगेकूच! इंग्लंडला धक्का? टीम इंडिया टाॅपवर..!
Marathi October 19, 2024 05:24 AM

WTC गुण सारणी: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान संघाने बरोबरी केली आहे. मालिकेतील दोन्ही सामने मुलतानमध्ये झाले. पहिला सामना इंग्लंडने तर दुसरा सामना पाकिस्तानने जिंकला आहे. या सामन्यानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 ​​च्या पॉइंट टेबलमध्ये फेरबदल झाले आहे. पाकिस्तान संघाने शेवचटचे स्थान सोडले आहे. मुलतानमधील विजयासह पाकिस्तान संघ 9व्या स्थानावरून 8व्या स्थानावर पोहोचला आहे. तर इंग्लंड संघ आपल्या स्थानावर कायम आहे. परंतु त्यांचा विजयाच्या टक्केवारीत नुकसान झाले.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 ​​च्या गुणतालिकेत या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघ शेवटच्या म्हणजे 9व्या स्थानावर होता. मात्र आता संघ 8व्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिज 9व्या स्थानी घसरले आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंड संघाची विजयाची टक्केवारी 45.59 होती. ती आता 43.06 वर घसरली आहे. सध्या टीम इंडिया 74.24 च्या विजयाच्या टक्केवारीसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया 62.50 टक्के विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर श्रीलंका आहे. ज्यांची विजयाची टक्केवारी 55.56 आहे.

इंग्लंडचा संघ चौथ्या, तर दक्षिण आफ्रिका पाचव्या स्थानावर आहे. ज्यांची विजयाची टक्केवारी 38.89 आहे. न्यूझीलंड 37.50 च्या विजयाच्या टक्केवारीसह सहाव्या स्थानावर आहे. बांग्लादेश संघ सातव्या स्थानावर आहे. ज्यांची विजयाची टक्केवारी 34.38 आहे. पाकिस्तानची विजयाची टक्केवारी आता 25.93 वर पोहोचली आहे. वेस्ट इंडिज 18.52 टक्के सामने जिंकून शेवटच्या स्थानावर आहे. सध्या, केवळ भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता आहे. डब्ल्यूटीसी फायनल जून 2025 मध्ये इंग्लंडमध्ये खेळली जाईल.

हेही वाचा-

शाकिब अल हसनच्या जीवाला धोका? शेवटच्या सामन्यापूर्वी मोठा गोंधळ! संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
PAK vs ENG, जे भारताला नाही जमलं, ते पाकिस्तानने करुन दाखवलं; 52 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये असे घडले
पहिल्या डावानंतर न्यूझीलंडकडे मोठी आघाडी, टीम इंडिया बॅकफूटवर


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.