खेळ थांबवल्यामुळे अंपायर्सवर भडकला रोहित शर्मा, चिन्नास्वामी मैदानावर मोठा गोंधळ
Marathi October 19, 2024 09:24 PM

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला पहिला कसोटी सामना बंगळुरू येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतानं न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचं लक्ष्य दिलंय.

भारतीय संघ दुसऱ्या डावात 462 धावांवर ऑलआऊट झाला. मात्र किवी संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आल्यानंतर खेळ अवघ्या 4 चेंडूनंतर थांबवण्यात आला. पंचांनी खराब प्रकाशामुळे हा निर्णय घेतला. भारतीय कर्णधार रोहित शर्माला पंचांचा हा निर्णय आवडला नाही. या निर्णयामुळे तो संतापलेला दिसला. त्यानं यावरून बराच वेळ पंचांशी वाद घातला. मात्र त्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं सामना पुन्हा सुरू होण्याची शक्यता संपुष्टात आली.

खरं तर, न्यूझीलंडचा संघ जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा ढगाळ वातावरणामुळे चेंडू खूप स्विंग होत होता. जसप्रीत बुमराह शानदार गोलंदाजी करत होता. त्याच्या एका बॉलवर रिव्युव्ह घेण्यात आला होता, ज्यात फलंदाज थोडक्यात वाचला. मात्र, 4 चेंडू टाकताच पंचांनी खराब प्रकाशामुळे सामना थांबवला. आकाशात काळ्याकुट्ट ढगांमुळे प्रकाश कमी झाला होता. यावर भारतीय कर्णधार रोहित शर्मा नाखूश दिसला. यावेळी टीम इंडियानं गोलंदाजी केली, तर त्यांना विकेट मिळण्याची शक्यता अधिक आहे, असं त्याला वाटत होतं. या कारणावरून त्यानं पंचांशी बराच वेळ वाद घातला. मात्र पंचांनी रोहित शर्माचं ऐकलं नाही आणि खेळ थांबवला. यानंतर काही वेळातच मुसळधार पाऊस सुरू झाला आणि सामना होण्याची सर्व शक्यता संपली.

दुसऱ्या डावात भारताकडून सरफराज खान आणि रिषभ पंत यांनी शानदार फलंदाजी केली. सरफराजनं 150 धावा केल्या, तर रिषभ पंत 99 धावा करून बाद झाला. पंत आऊट होताच भारताचा डाव गडबडला. टीम इंडिया 408/4 वरून 463 धावांवर ऑलआऊट झाली. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी सोपं लक्ष्य मिळालं. आता सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाचा व्यत्यय येतो की नाही, हे पाहणं महत्त्वाचं असेल.

हेही वाचा –

बंगळुरू कसोटीत भारत पराभवाच्या उंबरठ्यावर, न्यूझीलंडला विजयासाठी हव्या फक्त इतक्या धावा
“रोहित भाई, आरसीबीमध्ये ये”, चाहत्याची हिटमॅनकडे मागणी; मजेशीर VIDEO व्हायरल
“हा क्रिकेटपटू 2024 चा जावेद मियांदाद आहे”, संजय मांजरेकर यांचं मोठं वक्तव्य


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.