IND vs NZ : सर्फराजमुळे शुबमनची जागा धोक्यात, दुसऱ्या सामन्यात डच्चू मिळणार?
GH News October 19, 2024 11:08 PM

न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मुंबईकर सर्फराज खान याने दीडशतकी खेळी केली. सर्फराजने 195 बॉलमध्ये 18 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 150 धावा केल्या. सर्फराजला पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही. मात्र त्याने दुसऱ्या डावात ही खेळी करत सर्व भरपाई केली. सर्फराजच्या या खेळीमुळे शुबमन गिल याची डोकेदुखी दुप्पटीने वाढली आहे. सर्फराजला शुबमन गिल आणि केएल राहुल या दोघांमध्ये शानदार कामगिरीनंतरही फारशी संधी मिळाली नाही. सर्फराजला या पहिल्या सामन्यातही शुबमनच्या मानेला असलेल्या दुखापतीमुळे संधी मिळाली. सर्फराजने या संधीचा पूर्ण फायदा करुन दुसऱ्या कसोटीसाठीही दावा ठोकला आहे. त्यामुळे शुबमनची जागा धोक्यात आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तसेच केएल राहुल याच्यावरही टांगती तलवार आहे.

शुबमन गिलला दुखापत

शुबमना पहिल्या कसोटीआधी दुखापत झाली. त्यामुळे शुबमनच्या जागी सर्फराजचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. मात्र सर्फराज चौथ्या स्थानी बॅटिंगला आला. तर शुबमनच्या अनुपस्थितीत विराट कोहलीने तिसऱ्या स्थानी फलंदाजी केली. सर्फराजसह एकूण 5 फलंदाजांना पहिल्या डावात खातं उघडता आलं नाही. मात्र सर्फराजने दुसर्‍या डावात टीम इंडिया अडचणीत असताना दीडशतकी खेळी करत संकटमोचकाची भूमिका बजावली. त्यामुळे सर्फराजलाच दुसऱ्या सामन्यातही संधी द्यावी, असा सूर आता पहाायला मिळतोय. त्यामुळे आता शुबमनला दुसऱ्या कसोटीत बाहेर बसावं लागतं की केएलला डच्चू देऊन शुबमनचा समावेश केला जात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

सामन्याचा धावता आढावा

न्यूझीलंडने टीम इंडियाला पहिल्या डावात 46 वर गुंडाळल्यानंतर 402 धावा केल्या आणि 356ची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात टीम इंडियाने सर्फराज खान (150) आणि ऋषभ पंत (99) या मदतीने ऑलआऊट 462 रन्स केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 106 धावांची आघाडी मिळाली. तर आता न्यूझीलंडसमोर 107 धावांचं आव्हान आहे. पाचव्या आणि शेवटच्या दिवशी काय निकाल लागतो? याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.