शरद पवार गटाचा जागांचा आकडा ठरला? स्ट्राईक रेटवर देणार भर, पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत काय ठरलं?
निलेश बुधावले, एबीपी माझा October 20, 2024 12:13 AM

NCP Sharad Chandra Pawar Party : जागा वाटपात मोठा आकडा पदरात पाडून घेण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पुन्हा एकदा स्ट्राईक रेट वर भर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत मिशन 85 वर चर्चा झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 85 जागा लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

बैठकीत नेमकं काय घडलं?

आजच्या आज जागा वाटप सोडवून उमेदवारांना तत्काळ तयारीसाठी वेळ देण्याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांना शरद पवारांनी सूचना दिल्या आहेत. पक्षाने पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रामुख्याने जागा घेतल्याची बैठकीत चर्चा झाली आहे. तसेच पक्ष 85 जागा लढणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. पार्लमेंट्री बोर्डाच्या मीटिंगनंतर आता पक्षाच्या सर्व खासदारांसोबत शरद पवारांची बैठक सुरु झाली आहे.  या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जबादाऱ्यांचं वाटप करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मविआतील नाना पटोले-संजय राऊत वादावर उद्धव ठाकरेंची रिॲक्शन; शरद पवारांचाही दिल्लीला फोन

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.