गौरी केंजळे यांना कार्यगौरव पुरस्कार
esakal October 20, 2024 12:45 AM

पुणे, ता. १९ : बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ आणि फलज्योतिष अभ्यास मंडळातर्फे देण्यात येणारा कार्यगौरव पुरस्कार गौरी -कैलास ज्योतिष संस्थेच्या संचालक आचार्या गौरी केंजळे यांना प्रदान करण्यात आला. श्रीकृष्ण अनंत जकातदार यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ज्योतिष मेळाव्याच्या समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ उद्योजक अशोक चोरडिया, समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदकुमार कुलकर्णी, नंदकिशोर जकातदार, सतीश जकातदार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.