भावेश भिंडेला जामीन मंजूर
esakal October 20, 2024 12:45 PM

भावेश भिंडेला जामीन मंजूर
मुंबई, ता. १९ : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याचा मुंबई सत्र न्यायालयाने शनिवारी (ता. १९) जामीन मंजूर केला. भिंडे याला दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी १७ मे रोजी अटक केली होती. घाटकोपरच्या छेडानगर येेथील पेट्रोलपंपावर १२० बाय १२० फुटांचे भलेमोठे होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेत १६ जणांना आपले प्राण गमवावे लागले. याप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य आरोपी आणि जाहिरात कंपनीचा संचालक भावेश भिंडे याने जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.