आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 ऑक्टोबर 2024
esakal October 20, 2024 01:45 PM

पंचांग -

रविवार : आश्विन कृष्ण ३/४, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.३१, सूर्यास्त ६.०७, चंद्रोदय रात्री ८.३३, चंद्रास्त सकाळी ९.२२, संकष्ट चतुर्थी, करक चतुर्थी, दशरथी चतुर्थी, भारतीय सौर आश्विन २८ शके १९४६.

दिनविशेष -

  • १९९५ - जगविख्यात ‘ट्वेंटिएथ सेंच्युरी फॉक्स’ या चित्रपट संस्थेकडून हिंदी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांना ‘मॅन ऑफ द सेंच्युरी’ हा सन्मान जाहीर.

  • २००० - भारताच्या सीमा अंतीलने जागतिक कनिष्ठ मैदानी स्पर्धेत थाळीफेकीचे सुवर्णपदक पटकावले.

  • २००१ - ४१व्या राष्ट्रीय खुल्या मैदानी स्पर्धेत महाराष्ट्राच्या कविता पंड्या व माधुरी गुरनुले यांनी अनुक्रमे १०० मीटर व पाच हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.

  • २००१ - रंगभूमीवर सुमारे चाळीस वर्षे विविध प्रयोगांत मग्न असलेले पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.