Shreya Ghoshal : पुण्यात रंगणार श्रेया घोषाल 'लाइव्ह कॉन्सर्ट'
esakal October 20, 2024 01:45 PM

पुणे - बहारदार गाण्यांच्या सादरीकरणाने देशातच नव्हे तर, परदेशातही प्रसिद्ध असलेल्या बॉलिवूड गायिका श्रेया घोषाल यांचा ‘लाइव्ह कॉन्सर्ट’ सकाळ माध्यम समूहाने २८ डिसेंबर रोजी आयोजित केला आहे.

घोषाल सुमारे २० वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत गायन करतात. त्यांची अनेक गाणी गाजली आहेत. घोषाल यांच्या सुरांचे चाहते सर्व वयोगटांमध्ये आहेत. देशात- परदेशात त्यांच्या ‘लाइव्ह शों’ची मागणी वाढत आहे. त्यांच्या गायनाला गौरविण्यासाठी अमेरिकेतील ‘ओहायो’ राज्यात २६ जून हा दिवस ‘श्रेया घोषाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. अशा सुरांनी परिपूर्ण असलेल्या घोषाल यांचा लाइव्ह शो’ आता पुण्यात प्रदीर्घ कालावधीनंतर सादर होणार आहे. त्यासोबत भव्य ऑर्केस्ट्राही असेल.

‘पियू बोले’, ‘बरसो रे मेघा’, ‘ये इश्क हाए’, ‘चिकनी चमेली’, ‘मेरे ढोलना’ आदी त्यांची प्रसिद्ध गाणी लाइव्ह ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ‘बुक माय शो’ या बुकिंग ॲपवर कार्यक्रमाची तिकिटे उपलब्ध आहेत. मर्यादित प्रवेश असल्यामुळे प्रेक्षकांनी लवकरात लवकर बुकिंग करावे.

कार्यक्रमाबाबत

  • कधी - २८ डिसेंबर २०२४

  • वेळ - संध्याकाळी ६.३० वाजता

  • ठिकाण - सूर्यकांत काकडे फार्म्स, कोथरूड

  • बुकिंग - ‘बुक माय शो’ ॲपवर

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.