Teeth Whitening Tips : दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय
Marathi October 21, 2024 06:24 AM

आपल्या सौंदर्यात भर घालतं ते म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे हसू. हसल्यावर सर्वात आधी दिसतात ते दात. सफेद, पांढरे शुभ्र दात तुमची सुंदरता आणि व्यक्तीमत्त्वाला ओळख देतात. त्यामुळे निरोगी दातांसह दात सफेद, पांढरे शुभ्र असणे गरजेचे असते. पण, जर दात पिवळे आणि अस्वच्छ असतील तर तुमचा आत्मविश्वासही कमी होतो. अनेकदा दातांची योग्य स्वच्छता न राखल्याने आणि चुकिच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे कित्येकजण दात पिवळे होण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. यात चहा , कॉफी, सॉस, रेड वाइनचे सेवनही कारणीभूत ठरत आहेत. बऱ्याचवेळा पान, तंबाखू यांसारख्या गोष्टी दातांची शुभ्रता कमी करतात, हेही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळेच तुम्ही सुद्धा दातांच्या पिवळसरपणाच्या समस्येला कंटाळले असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. आज आम्ही दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्यांचा नियमित वापर केल्यास तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

घरगुती उपाय –

आंब्याच्या पानांचा वापर करुन दातांचा पिवळेपणा घालवता येतो. यासाठी दोन आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्या. यानंतर ही पाने दातांनी चावून त्याची तोंडात पेस्ट बनवा आणि नंतर ती थूकून द्यावी. हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यास दांताचा पिवळेपणा कमी होऊ शकतो.

तुळशीच्या पानांमध्ये अनेक बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आढळतात, जे दातांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. तुळशीची पाने दातांसाठी वापरताना उन्हात वाळवून त्याची बारीक पावडर करून घ्यावी. तयार पावडर आणि एक चमचा मोहरीचे तेल घेवून त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट दातांना लावून 5 ते 6 मिनीटांनी दात स्वच्छा धुवून घ्या. या उपायाने दातांचा पिवळेपणा नक्कीच कमी होऊ शकतो.

लिंबू आणि सोड्याचे मिश्रण दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी खूप प्रभावी उपाय मानला जातो. यासाठी एख चमचा बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस एकत्र करून घ्या. ही पेस्ट टुथब्रशच्या साहाय्याने दातांवर घासा. हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा केल्यास दांताचा पिवळेपणा कमी होऊ शकतो.

दात पिवळसर होण्याची समस्या दूर होण्यासाठी कोमट पाण्यात मीठ आणि आले मिक्स करून या पाण्याने गुळण्या करा. असे केल्याने दातांचा पिवळेपणा आणि तोंडाची दुर्गधी नाहीशी होते.

कडूलिंबाच्या काड्या दातांना लावणे अत्यंत पारंपारीक उपाय मानला जातो. बॅक्टेरियल गुणधर्म यात आढळतात. ज्यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते. तसेच दातांसह हिरड्या देखील मजबूत होतात.

बेकिंग सोड्याच्या साहाय्याने दातांचा पिवळेपणा दूर होऊ शकतो. याव्यतिरिक्त खोबरेल तेलही फायदेशीर ठरेल. यासाठी खोबरेल तेल तोंडात काही मिनीटे ठेवा आणि नंतर तोंड स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. या उपायाने दातांचा पिवळेपणा नक्कीच कमी होऊ शकतो.

 

 

 

 

 

हेही पाहा –


संपादन – चैताली शिंदे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.