Diwali Recipe 2024: घरच्या घरी बनवा खुसखुशीत अन् रसरसीत चिरोटे, आजच नोट करा रेसिपी
esakal October 21, 2024 06:45 AM

Diwali Recipe 2024 Chirote Recipe: दिवाळीला अवघे काही दिवस बाकी आहेत. घराघरांमध्ये साफसफाई, रंग-रंगाटी, सजावट तर फराळाची तयार सुरू आहे. हिंदू धर्मात दिवाळा हा सर्वात महत्वाचा सण आहे.

भारतात दिवाळी हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. यंदा दिवाळी काही ठिकाणी १ नोव्हेंबरला तर कुठे ३१ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. दिवाळीत फटाके फोडणे, नवीन कपडे घालणे एवढेच नसून महिलांनी घरी बनवलेल्या स्वादिष्ट फराळांची चव चाखण्याची मज्जाच वेगळे असते.

दिवाळीचा फराळ म्हटले की सर्वांच्या तोंडाला पाणी येतं. दिवाळी फराळाच्या पारंपारिक पदार्थांमध्ये चिरोटे या पदार्थाचा समावेश असतो. याआधी आपण गोड शंकरपाळी कशी बनवायची हे जाणून घेतले. आज चिरोटे कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत.

तुम्हाला यंदा दिवाळीत घरच्या घरी खुसखुशीत अन् रसरसीत चिरोटे बनवायचे असेल तर पुढील व्हिडिओची मदत घेऊ शकता. हा व्हिडिओ पाहून तुम्ही झटपट आणि पारंपारिक चवीचे खुसखुशीत अन् रसरसीत चिरोटे तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया खुसखुशीत अन् रसरसीत चिरोटे अनारसे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि बनवण्याची पद्धत कशी आहे.

खुसखुशीत आणि रसरसीत चिरोटे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

साखरेचा पाक बनवण्यासाठी लागणारे साहित्य


साखर अर्धा किलो (2 कप )
पाणी 250ml (1 कप )
वेलची पूड
केशर
लिंबाचा रस

खाजा बनवण्यासाठी लागणारे पीठ


मैदा अर्धा किलो (4 कप )
तूप १२० ग्रॅम (1/2कप )
मीठ चवीनुसार
पाणी एक कप किंवा गरजेप्रमाणे
तळण्यासाठी तेल

साटा बनवण्यासाठी लागणारे साहित्य


मैदा - ३ चमचे
तूप - ३ चमचे

खुसखुशीत आणि रसरसीत चिरोटे बनवण्याची कृती

चिरोटे बनवण्यासाठी सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात मैदा घ्यावा. त्यात तूप आणि मीठ घालून चांगले मिक्स करायचे आहे.

गरजेनुसार पाणी घालून पीठ चांगले मळून घ्यावे.

हे पीठ थोडा वेळा झाकन ठेऊन बाजूला ठेवावे.

साठा बनवण्यासाठी तूपात मैदा किंवा कॉर्न फ्लॉअर टाकून सारण तयार करावे.

नंतर भिजवलेले पीठ चांगले मळून घ्यावे.

मऊ झाल्यावर पीठाची गोल पोळी लाटून घ्यावी. त्यावर साठा लावावा, नंतर एक मोठी पोळी लाटून त्यावर ठेवा आणि परत साठा लावावे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे करावे.

नंतर गोल रोल करावे. नंतर चाकूनच्या मदतीने काप करावे.

नंतर हाताच्या मदतीने स्प्रेस करावे आणि गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळावे.

नंतर साखरेच्या पाकात २ ते ३ मिनिट ठेऊन काढून घ्यावे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.