मोठी बामती! काँग्रेसच्या 45 उमेदवारांची नावे निश्चित, पहिली संभाव्य यादी 'एबीपी माझा'च्या हाती; अनेक बड्या नेत्यांना तिकीट
तुषार कोहळे October 21, 2024 10:13 AM

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 20 ऑक्टोबर रोजी भाजपाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाच्या पहिल्या यादीत एकूण 99 नावे आहेत. त्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातून जागावाटपासंदर्भात मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसमध्ये एकूण ५४ उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. त्यामुळे या उमेदवारांची पहिली यादी उद्या म्हणजेच 22 ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातील काही प्रमुख उमेदवारांच्या नावांची यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. 

निश्चित झालेल्या उमेदवारांची नावे

नाना पटोले - साकोली

विरेंद्र जगताप- धामणगाव

यशोमती ठाकूर- तिवसा

विजय वडेट्टीवार- ब्रमपुरी

अमित झनक- रिसोड

नितीन राऊत- उत्तर नागपूर

विकास ठाकरे- पश्चिम नागपूर

रणजित कांबळे- देवळी (वर्धा)

सुभाष धोटे- राजूरा ( चंद्रपूर)

डॉ सुनील देशमुख - अमरावती शहर

बबलू देशमुख- अचलपूर 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.