Sanjay Raut gave information regarding the announcement of the first list of Mahavikas Aghadi rrp
Marathi October 21, 2024 06:25 PM


विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपाने पाच दिवसांनी आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यानंतर आता महाविकास आघाडीची पहिली यादी कधी येईल, याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपाने पाच दिवसांनी आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. याशिवाय महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आज त्यांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. अशातच आता महाविकास आघाडीची पहिली यादी कधी येईल, याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली आहे. (Sanjay Raut gave information regarding the announcement of the first list of Mahavikas Aghadi)

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, कोणताही एक विभाग हा एखाद्या पक्षाचा नसतो. पण एखाद्या भागावर कोणत्याही पक्षाचा प्रभाव असतो. कोकण, मुंबईत आणि उत्तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागात शिवसेनेचा प्रभाव आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट फारच नगण्य आहे. पण तेथील काही जागांवर त्यांची ताकद आहे. वर्ध्यात त्यांचे खासदार निवडून आलेले आहेत, तर काही ठिकाणी आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्यात आणि आमच्यात काही वाद होण्याचा प्रश्न नाही. तसेच काँग्रेस पक्षाशी सुद्धा एक-दोन जागा सोडल्यास आमच्यात फार मोठे मतभेद आहेत, असं मला वाटत नाही. एखाद्या जागेवर दोन पक्षाचे कार्यकर्ते दावा सांगतात. परंतु त्यातून मार्ग काढावा लागेल. आज संध्याकाळपर्यंत हा मार्ग निघेल. त्यासंबंधात आमच्या मनात कोणतीही शंका नाही. त्यामुळे कदाचित आज आम्हाला जमलं तर तीन पक्षाचा जागावाटपाची जी यादी आणि फॉर्म्युला आहे, तो आज देखील जाहीर करू. इतपर्यंत आमची तयारी आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

– Advertisement –

हेही वाचा – Sanjay Raut : …तर नक्कीच मी सरन्यायाधीशांच्या पायाचं तीर्थ पिणार; संजय राऊत असं का म्हणाले?

भाजपाची पहिली यादी जाहीर होते, पण महाविकास आघाडीतील अद्यापही चर्चा सुरू आहे का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, भाजपाची पहिली यादी जाहीर झाली म्हणजे त्यांनी फार मोठं तीर मारलं असं होत नाही. त्यांचे 99 टक्के विद्यमान आमदार जाहीर झालेलं आहे. त्यांनी वेगळं काही जाहीर केलेलं आहे का? यात कुणालाच आनंदाच्या गुदगुल्या होण्याचं काहीच कारण नाही. आम्ही सुद्धा आमच्या आमदारांना गो हेड दिलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या आमच्या हक्क्कांच्या जागा आहेत, तिथल्या उमेदवारांना, आमदारांना मातोश्रीवर बोलावून कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आमची कामाची पद्धत हीच आहे. आम्ही उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहे, हे वास्तव्य आहे.

– Advertisement –

विदर्भातल्या 12 जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडायच्या नाहीत, असा सूर काँग्रेस नेत्यांनी मल्लिकार्जुन खर्गेंकडे बोलून दाखवला आहे. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, असा काही सूर लागला असेल, असे मला वाटत नाही. सूर असेल लागले नाही तर तर सर्वांची सूर बिघडतात. परंतु मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी आमचा संवाद सुरू आहे. काँग्रेस हायकमांड ही कायम सामज्यंस भूमिका घेणारी संस्था आहे. झारखंडमध्ये सुद्धा निवडणुका आहे. याचपार्श्वभूमीवर मी बातमी वाचली की, झारखंडमधील मित्रपक्षात आणि काँग्रेसमध्ये काही मतभेद आहेत. विशेषत: हेमंत सोरेन, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्यात मतभेद आहेत. पण निवडणुकीच्या आधी जागावाटपात अशाप्रकारचे थोडेसे राग, लोप आणि रुसवे होत असतात. त्याकडे फार गांभीर्याने पाहू नका. आम्ही एकत्रच निवडणुका लढणार आहोत, असेही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा – Maharashtra : अखेर मुहूर्त ठरला; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निलेश राणे हाती घेणार धनुष्यबाण


Edited By Rohit Patil



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.