Share Market Opening: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स 545 अंकांनी वाढला, निफ्टी 25,000च्या जवळ
esakal October 21, 2024 10:45 PM

Share Market Opening Latest Update 21 October 2024: आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय बाजाराने जोरदार सुरुवात केली आहे. आज बाजाराची सुरुवात तेजीसह झाली आहे. सेन्सेक्स 545 अंकांच्या किंवा 0.58 टक्क्यांच्या वाढीसह 81,695.18 च्या पातळीवर व्यवहार करत होता.

तर निफ्टी 101.85 अंकांच्या किंवा 0.41 टक्क्यांच्या वाढीसह 24,955.90 च्या पातळीवर व्यवहार करत होता. बँक निफ्टी अर्ध्या टक्क्यांच्या वाढीसह उघडला आणि मिडकॅप निर्देशांकही चतुर्थांश टक्क्यांच्या वाढीसह उघडला.

टेक महिंद्रामध्ये जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळत आहे. सध्या टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, एसबीआय लाइफ, ॲक्सिस बँक आणि विप्रो हे निफ्टीचे सर्वाधिक वाढले आहेत. त्याच वेळी, टाटा कंझ्युमर कमकुवत निकालानंतर सुमारे 7 टक्क्यांनी घसरला आणि तो टॉप लूझर आहे. याशिवाय कोटक महिंद्रा बँकेत 3% आणि भारती एअरटेलमध्ये दीड टक्क्यांची घसरण झाली आहे. हे निफ्टीचे टॉप लूजर्स आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.