अदर पुनावाला आता चित्रपट बनवणार
Marathi October 22, 2024 08:25 AM

कोविड लस बनवणाऱ्या सीरम इन्स्टिटय़ूटचे सर्वेसर्वा अदर पुनावाला आता करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये 50 टक्के भागीदारी विकत घेणार आहेत. अदर पुनावाला आणि धर्मा प्रोडक्शनमधील ही डील 1000 कोटी रुपयांना होणार असल्याचे समजते. धर्मा प्रोडक्शन फिल्म इंडस्ट्रीमधील मोठी कंपनी आहे. त्यात भागीदारी मिळवत अदर पुनावाला फिल्म इंडस्ट्रीत एंट्री घेणार आहेत. पुनावाला यांच्याशी झालेल्या करारानंतरही करण जोहर कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष राहणार आहे व अपूर्व मेहता सीईओ असतील, अशी माहिती सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.

धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती

धर्मा प्रॉडक्शनची स्थापना 1976 मध्ये यश जोहर यांनी केली होती. यश जोहर यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा करण जोहरने कंपनीची धुरा हाती घेतली. या प्रोडक्शन कंपनीने ‘कभी खुशी कभी गम’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘माय नेम इज खान’, ‘केसरी’, ‘सिंबा’, ‘स्टुंडट ऑफ द इयर’ आणि ‘2 स्टेट्स’ यांसारख्या ब्लॉकबस्टरसह 50 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.