Latest Maharashtra News Updates : धारावी मतदारसंघातून ठाकरेंचे बाबूराव माने इच्छूक
esakal October 22, 2024 10:45 AM
धारावी मतदारसंघातून ठाकरेंचे बाबूराव माने इच्छूक

ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामधील जागा वाटपाचा पेच कायम असताना मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघ हा देखील ठाकरेंनी आपल्याकडेच घ्यावा अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. काँग्रेसचा विधानसभा मतदार संघ असलेल्या धारावीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने इच्छुक आहेत. धारावीच्या पुनर्विकासाच्या प्रश्नासंदर्भात बाबुराव माने आणि धारावी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

भाजपचे कुलाब्याचे माजी आमदार राज पुरोहित सागरवर दाखल

भाजपचे कुलाब्याचे माजी आमदार राज पुरोहित सागरवर दाखल झाले आहेत. राज पुरोहित नाराज असल्याने बंडखोरीची चर्चा होत आहे.

राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार

राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा केली आहे.

उद्या १ वाजता महाविकास आघाडीची बैठक

उद्या १ वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

राऊस एव्हेन्यू कोर्टाने आप आमदार अमानतुल्ला खान यांच्या जामीन याचिकेवर ईडीला नोटीस बजावली

राऊस एव्हेन्यू कोर्टाने आप आमदार अमानतुल्ला खान यांच्या जामीन याचिकेवर ईडीला नोटीस बजावली आहे. दिल्ली वक्फ बोर्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांना ईडीने २ सप्टेंबर रोजी अटक केली होती.

भाजप पदाधिकारी शीतल केदार यांचा राजीनामा

भाजप पदाधिकारी शीतल केदार यांनी राजीनामा दिला आहे. उमेदवारी न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

Shivsena Live: शिवसेना उमेदवारांची यादी आज प्रसिद्ध होण्याची शक्यता

शिवसेना उमेदवारांची यादी आज प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरून शिवसेनेच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीत ६० ते ७५ उमेदवारांची नावे असतील. उर्वरीत उमेदवारांची यादी नंतर जाहीर होणार. आज रात्रीपासूनच शिवसेना उमेदवारांना AB फॅार्म देण्याची प्रक्रिया सुरू होणार.

Gadchiloli Live : गडचिरोलीत ४ नक्षलवाद्यांचा खात्मा; भामरागडच्या जंगलात घडला थरार

गडचिरोलीतील भामरागडच्या जंगलात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. यामध्ये ४ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अजूनही ही चकमक सुरुच आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नरनी घेतली दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट

जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी आज श्रीनगरच्या SKIMS रूग्णालयात जाऊन गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर येथील बांधकाम स्थळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या कामगारांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Vidhansabha Election Live : देवगिरी बंगल्यावर आतापर्यंत आलेले आमदार, उमेदवार

देवगिरी बंगल्यावर आतापर्यंत आलेले आमदार, उमेदवार खालीलप्रमाणे आहेत.

१. राजेश विटेकर - परिषद आमदार (इच्छुक)

२. संजय बनसोडे

३. चेतन तुपे

४. सुनील टिंगरे

५. दिलीप वळसे पाटील

६. दौलत दरोडा

७. राजेश पाटील

८. दत्तात्रय भरणे

९. आशुतोष काळे

१०. हिरामण खोसकर

११. ⁠नरहरी झिरवळ

१२. ⁠छगन भुजबळ

१३. ⁠भरत गावित - एबी फॅार्म दिला

१४. ⁠बाबासाहेब पाटील

१५. ⁠नितीन पवार

Pune Live: न्यूझीलंडचा क्रिकेट संघ पुण्यात दाखल

भारताविरुद्ध न्यूझीलंडला पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना खेळायचा आहे. २४ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सामन्यासाठी न्यूझीलंड संघ पुण्यात दाखल झाला आहे.

Maharashtra Live: परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीर

परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीर झाले आहे.

  • बच्चू कडू: अचलपूर

  • अनिल चौधरी: रावेर

  • गणेश निंबाळकर: चांदवड

  • वामनराव चटप: राजुरा

  • शिरोळ, मिरज या दोन मतदारसंघात स्वाभिमानी उमेदवार उद्या जाहीर करेल

  • अंकुश कदम: ऐरोली

  • सुभाष साबणे: देंगलुर

सलग दोन दिवस पुण्यातील नेत्यांशी राज ठाकरे यांची चर्चा

सलग दोन दिवस पुण्यातील नेत्यांशी राज ठाकरे यांची चर्चा झाली आहे .

'महाविकास आघाडी सत्तेत येईल आणि आमचं सरकार बनवेल' - रमेश चेन्नीथला

महाविकास आघाडी सत्तेत येईल आणि आमचं सरकार बनवेल. आमची स्क्रिनिंग कमिटीची बैठक झाली. 5 वाजता CEC बैठक आहे आज बाकी सगळ्या जागांवर चर्चा झाली आहे.

रामेश्वरम शहरात पावसाची हजेरी

तामिळनाडूमधील रामेश्वरम शहरात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे.

भारताच्या निवडणूक आयोगाने अजय कुमार सिंग यांची DGP झारखंड म्हणून नियुक्ती केली

भारताच्या निवडणूक आयोगाने आज अजय कुमार सिंग यांना DGP झारखंड म्हणून नियुक्तीसाठी मान्यता दिली आहे, जे कॅडरमधील सर्वात वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. अजय कुमार सिंग हे भारतीय पोलीस सेवेच्या 1989 च्या तुकडीचे आहेत.

Arvind Kejriwal Live : केजरीवालांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात समन्स रद्द करण्यास नकार देणाऱ्या गुजरात हायकोर्टाच्या आदेशाविरुद्ध अरविंद केजरीवाल यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Jammu And Kashmir Live: जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात डॉक्टरसह 7 जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील गांदरबल इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका डॉक्टरसह 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या हल्ल्याचा तपास आता एनआयए करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

जम्मू आणि काश्मीरमधल्या नागरिकांवर झालेला हल्ला आहे, या हल्ल्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांना शोधून काढलं जाईल आणि सुरक्षा दलांकडून या हल्याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

CM Eknath Shinde Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 23 ऑक्टोबरला भरणार अर्ज

विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 23 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते ठाण्यातील कोपरी-पाचपखाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

Pune Live News: राहुल कुल यांना उमेदवारी दिल्याने युतीत नाराजी नाट्य

राहुल कुल यांना उमेदवारी दिल्यावरून युतीत नाराजी नाट्य सुरु झाल आहे. दौंड तालुक्यावरून राष्ट्रवादी अजित पवार पक्ष नाराज झाला आहे. राहुल कुल यांना उमेदवारी दिली पण ही जागा आमचीच असल्याचा दावा राष्ट्रवादी करत आहे.

Nashik live महायुती मध्ये वादाची ठिणगी

सुहास कांदेना उमेदवारी दिल्यास काम करणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची भूमिका. नांदगांव-मनमाड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी घेणार अजित दादांची भेट. अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला जागा देण्यात यावी अशी मागणी करणार. जागा राष्ट्रवादीला मिळावी अथवा शिवसेनेने उमेदवार बदलावा अशी मागणी करणार.महायुतीचे काम करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा नकार

Mumbai Live News: मुंबादेवीचे माजी आमदार अतुल शाह फडणवीसांच्या भेटीला

मुंबादेवीचे माजी आमदार अतुल शाह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

मुंबादेवी येथून अतुल शाह इच्छुक आहेत

मुंबादेवी मतदारसंघावरून राष्ट्रवादी व भाजपमध्ये रस्सीखेच सुरु

Kalyan Politics Live: शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड घेणार पत्रकार परिषद

शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड आज १२ वाजता त्यांच्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहे. गणपत गायकवाड यांची पत्नी भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांना कल्याण पुर्वेतून ऊमेदवारी मिळाल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी प्रचार करणार नाही अशी भुमिका पदाधिकाऱ्यांनी घेतलीय

Mumbai bjp live: मुरजी पटेल देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

अंधेरी पूर्व येथून इच्छुक मुरजी पटेल देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

भाजपकडून अंधेरी पूर्व येथे पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांनी भरला होता अर्ज

Maharashtra Assembly elections 2024 Live Updates: जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं यासाठी मानवी साखळीच्या माध्यमातून करण्यात आली मतदार जागृती

वर्ध्यात आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं यासाठी मानवी साखळीच्या माध्यमातून करण्यात आली मतदार जागृती.

CM Eknath Shinde Live Updates: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांना पुष्पांजली वाहिली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पुष्पांजली वाहिली.

Women's T20 World Cup Live Updates: दक्षिण आफ्रिकेवर मात करत न्यूझीलंडनं पहिल्यांदाच जिंकलं विश्वविजेतेपद

महिलांच्या टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर मात करत न्यूझीलंडनं पहिल्यांदाच जिंकलं विश्वविजेतेपद.

Maharashtra Weather LIVE : कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाने आज कोकणामधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नंदुरबार, धुळे , जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे.

Sambra Airport LIVE : सांबरा विमानतळावर बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी धमकी

बेळगाव : बेळगावातील सांबरा विमानतळावर बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी इमेलद्वारे देण्यात आली आहे. याची गंभीर दखल घेऊन विमानतळासह परिसराची विशेष पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. यावेळी कोणत्याही स्वरूपाची संशयास्पद वस्तू आढळून आली नाही, असे पोलिस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. दरम्यान, धमकी ईमेलनंतर विमानतळ परिसरात बंदोबस्त वाढविला असून, याप्रकरणी अज्ञाताविरोधात मारीहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Police Commemoration Day LIVE : पोलीस स्मृती दिनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन, मुख्यमंत्री शिंदेंनी पोलीस जवानांना वाहिली आदरांजली

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस स्मृती दिनानिमित्त कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस जवानांना आदरांजली अर्पण केली.

Vitthal Birdev Yatra LIVE : पट्टणकोडोलीत विठ्ठल बिरदेव यात्रेसाठी लाखो भाविक दाखल, आज भाकणूक

पट्टणकोडोली : महाराष्ट्रासह पाच राज्यांत प्रसिद्ध असणारी व लाखो भाविकांचे दैवत श्री विठ्ठल बिरदेवाची यात्रा सोमवार (ता. २१) होत असल्याने गावात लाखो भाविकांनी हजेरी लावलेली आहे. यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पारंपरिक पद्धतीने यात्रा पार पाडण्यासाठी समस्त पुजारी धनगर समाज व ग्रामपंचायतीने मोठ्या उत्साहाने सर्व नियोजन केले आहे. यात्रेतील मुख्य सोहळा म्हणजे फरांडे बाबांची भाकणूक होय. ही भाकणूक सोमवारी (ता. २१) होणार असल्याने लाखो भाविकांनी पट्टणकोडोली येथे हजेरी लावली आहे.

Halsiddhnath Yatra LIVE : कर्नाटक-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हालसिद्धनाथ यात्रेचा आज मुख्य दिवस

म्हाकवे : कर्नाटक-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आप्पाचीवाडी-कुर्ली येथील हालसिद्धनाथ यात्रेच्या तिसऱ्या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत. सकाळी व संध्याकाळी सात वाजता मानकरी, पुजारी, यात्रा समितीच्या उपस्थितीत आरती झाली. दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सोमवारी (ता. २१) यात्रेचा मुख्य दिवस असल्याने या ठिकाणी गर्दी होत आहे. दोन-तीन दिवसांत कर्नाटक महाराष्ट्रातून लाखो भाविक येथे दर्शनाला आले आहेत.

Mumbai-Goa Highway LIVE : मुंबई-गोवा महामार्गावर मोठी दुर्घटना टळली, ज्वलनशील रसायनने भरलेल्या टँकरने घेतला पेट

पाली : मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी (ता. 20) रात्री माणगाव तालुक्यातील घोटवळ गावाजवळ मोठी दुर्घटना टळली. ज्वलनशील रसायन भरलेल्या टँकरने अचानक पेट घेतला. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे व स्थानिक बचाव पथक आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ही आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. यावेळी येथील वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती.

Maharashtra Assembly Elections LIVE : विधानसभेचा महासंग्राम उद्यापासून, अर्ज भरण्याला होणार प्रारंभ

Latest Marathi Live Updates 21 October 2024 : महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जात असतानाच भाजपने काल विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत उमेदवार निवडीमध्ये आघाडी घेतली आहे. आज 'मविआ'ची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवणुकीसाठी मंगळवारपासून (ता. २२) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. तर, ‘उमेदवार उभे करायचे की इतरांचे पाडायचे हे ठरवू’, असा यापूर्वी इशारा देणारे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अखेर विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण असून पुढील दोन-तीन दिवस हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.