मोठी बातमी! टाटा समूहाचा तब्बल 55 हजार कोटींचा तगडा आयपीओ येणार, पडणार पैशांचा पाऊस?
Marathi October 22, 2024 02:25 PM

टाटा सन्स IPO: या वर्षी आलेल्या बहुसंख्य आयपीओंना गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे यातील बऱ्याच आयपीओंनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले. काही आपयीओंनी तर गुंतवणूकदारांचे पैसे थेट दुप्पट केले. या वर्षी ह्युंदाई मोटर्स इंडिया या कंपनीचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ आला. या आयपीओलाही गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान, ह्युंदाईनंतर लवकरच आणखी एक दमदार आयपीओ येण्याची शक्यात आहे. विशेष म्हणजे हा आयपीओ जगभरात मोठं नाव असलेल्या टाटा उद्योग समूहाचा असू शकतो.

आरबीआयने विनंती फेटाळली

मिळालेल्या माहितीनुसार टाटा सन्स चा आपयीओ लवकरच येऊ शकतो. कारण नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय दिला आहे. टााट उद्योग समूहाने आरबीआयकडे टाटा सन्स या कंपनीला शेअर बाजारावर सूचिबद्ध न करण्याची सूट मिळावी, अशी विनंती केली होती. मात्र आरबीआयने ही विनंती फेटाळली आहे. त्यामुळे आरबीआयच्या या निर्णयानंतर टाटा उद्योग समूहाला टाटा सन्सचा आयपीओ घेऊन यावा लागणार आहे. असे झाल्यास गुंतवणूकदारांसाठी चांगल्या परताव्याची ही एक चांगली पर्वणी असू शकते.

टाटा उद्योग समूहांच्या कंपन्यांचे शेअर्स तेजीत

आरबीआयच्या निर्णयानंतर टाटा सन्सचा आयपीओ (Tata Sons IPO) येण्याची शक्यता वाडली आहे. विशेष म्हणजे टाटा सन्सचा आयपीओ येण्याची शक्यता लक्षात येताच गुंतवणूकदारांनी टाटा उद्योग समूहाच्या इतर कंपन्यांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. टाटाच्या काही कंपन्यांच्या शेअरचे मूल्य चांगलेच वाढले. सोमवारी म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी सत्र चालू असताना टाटा उद्योग समूहाच्या टाटा केमिकल्स या कंपनीचे शेअर्स साधारण 14 टक्क्यांनी वाढले. बाजार बंद झाला तेव्हा दिवसाअखेर हा शेअर 8.73 टक्क्यांच्या तेजीसह 1183 रुपयांवर बंद झाला. टाटा इन्व्हेस्टमेंट या कंपनीचे शेअर्सही (Tata Investment Stock Price) साधारण 9 टक्क्यांनी वाढले. मात्र बाजार बंद झाला तेव्हा हा शेअर 3.60 टक्क्यांपर्यंत वाढून 7059.80 रुपयांवर पोहोचला. यासह तेजस नेटवर्क (Tejas Network) या कंपनीच्या शेअरमध्येही सत्र चालू असताना 11.04 टक्क्यांची वाढ झाली. हा शेअर 3.57 टक्क्यांच्या वाढसह बंद झाला.

सप्टेंबर 2025 पर्यंत आयपीओ येणार?

दरम्यान, आरबीआयच्या निर्णयानंतर टाटा उद्योग समूहाला टाटा सन्स या कंपनीला सप्टेंबर 2025 पर्यंत शेअर बाजारावर सूचिबद्ध करावे लागणार आहे. म्हणजेच टाटा सन्स या कंपनीचा आयपीओ सप्टेंबर 2025 पर्यंत येण्याची शक्यता आहे. टाटा सन्स या कंपनीवर सध्या 20,270 कोटी रुपयांचे कर्ज आहे. एका अंदाजानुसार टाटा सन्स या कंपनीचे एकूण मूल्य हे 11 लाख कोटी रुपये असू शकते. म्हणजेच या कंपनीने आयपीओच्या माध्यमातून आपल्या फक्त 5 टक्के शेअर्स विकले तरी त्या आयपीओचा आकार तब्बल 55 हजार कोटी रुपयांचा होईल. म्हणजेच हा आयपीओ ह्युंदाई मोर्टसपेक्षाही मोठा असू शकतो. ह्युदाई मोटर्स इंडिया या कंपनीचा आयपीओ 27,870 कोटी रुपयांचा होता. हा आयपीओ आतापर्यंतचा सर्वांत मोठा आहे.

हेही वाचा :

सोन्याला पुन्हा झळाळी! 450 रुपयांनी महागलं, सणासुदीच्या काळात थेट 80 हजारांचा आकडा पार करणार?

दिवाळीच्या तोंडावर आयपीओंचा धमाका! या आठवड्यात ‘हे’ तीन जबरदस्त आयपीओ येणार; पैसे कमवण्याची मोठी संधी

‘या’ दमदार आयपीओची तारीख आली, पैसे कमवण्याची वेळ झाली! दिवाळीच्या तोंडावर मिळवा दमदार रिटर्न्स!

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.