Health Tips : दृष्टीक्षमता वाढवण्यासाठी डाएटमध्ये समाविष्ट करा हे पदार्थ
Marathi October 22, 2024 04:24 PM

स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरची स्क्रीन दिवसभर पाहिल्यामुळे डोळ्यांवर खूप ताण पडू शकतो. यामुळेच डोळ्यांच्या दृष्टीवर त्याचा परिणाम होतो. ही समस्या केवळ वयस्कर व्यक्तींमध्येच नाही तर लहान मुलांमध्येही पाहायला मिळते. यासाठीच नीट पाहता यावं म्हणून चष्म्याचा आधार घ्यावा लागतो. डोळ्यांची नजर कमी होण्यामागेही अनेक कारणं असू शकतात. ज्यात आहाराचाही समावेश आहे. जर आहारात आवश्यक पोषणतत्त्वांचा समावेश नसेल तर डोळे हळूहळू कमजोर होऊ लागतात.

यासाठीच आवश्यक आहे की डोळ्यांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण आपला स्क्रीन टाईम कमी करायला हवा. आणि आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी. डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्हिटामिन ए आणि अँटिऑक्सिडंटस असलेल्या पदार्थांचे सेवन करायला हवे.

– जाहिरात –

डोळ्यांच्या आरोग्यासाठी काय खावे ?

गाजर :

यामध्ये बीटा-कॅरोटिन आणि व्हिटामिन ए असतं जे डोळ्यांच्या रेटिनाला मजबूत करतात. आणि नजर सुधारतात. यासाठीच प्रयत्न करा की सॅलडमध्ये गाजराचा समावेश असेल.

पालक :

ल्यूटिन आणि जॅक्सेंथिनसारख्या अँटिऑक्सिडंटसनी समृद्ध असणारे पालक डोळ्यांच्या पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतात. पालक हे शरीराच्या वेगवेगळ्या अंगांसाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी हे रोज खा.

– जाहिरात –

रताळे :

हा बीटा-कॅरोटिनचा उत्तम स्रोत आहे. जो डोळ्यांच्या एजिंगच्या समस्येपासून आपलं रक्षण करतो आणि डोळ्यांना हेल्दीदेखील ठेवतो.

टोमॅटो :

यामध्ये लायकोपीन आणि व्हिटामिन सी असते. जे डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवते आणि दृष्टीही सुधारते.

ढोबळी मिरची :

व्हिटामिन ए आणि व्हिटामिन सीने युक्त असणारी ढोबळी मिरची डोळ्यांच्या मांसपेशींना मजबूत करते. आणि डोळ्यांचा थकवाही कमी करण्यास मदत करते.

केळे :

पोटॅशियम आणि व्हिटामिन ए असलेले केळे डोळ्यांना हायड्रेट ठेवण्याचे काम करते. आणि दृष्टी सुधारण्याचे काम करते. यामुळे आय स्ट्रेन आणि ड्राय आयची समस्या दूर होते.

ब्लूबेरी:

यामध्ये अँटिऑक्सिडंटस असतात जे डोळ्यांच्या पेशींचे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करतात आणि दृष्टी सुधारतात.

पेरू :

व्हिटामिन ए आणि सी असणारा पेरु दृष्टी सुधारण्यासाठी फायदेशीर आहे.

ब्रोकोली:

यामध्ये ल्यूटिन आणि जॅक्सेंथिन हे घटक असतात. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आणि मोतीबिंदू रोखण्यासाठी मदत करू शकते.

संत्रे :

व्हिटामिन-सी ने युक्त संत्रे डोळ्यांच्या नसा स्वस्थ ठेवते. आणि डोळ्यांची दृष्टीही सुधारते.

हेही वाचा : Health Tips : या पदार्थांच्या सेवनामुळे होतो हेअरफॉल


संपादन- तन्वी गुंडये

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.