हृतिक रोशनच्या क्रिश 4 मध्ये रणबीर कपूरची एन्ट्री? चित्रपटाबाबत मोठी अपडेट
नामदेव जगताप October 22, 2024 04:43 PM

Krrish 4 Movie Latest Update : बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनच्या आगामी 'क्रिश 4' चित्रपटाबाबत मोठी बातमी येत आहे. यात रणबीर कपूरही दिसणार असल्याचं बोललं जात आहे. हृतिक रोशनच्या क्रिश 4 या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. फिल्म इंडस्ट्रीला क्रिश चित्रपटामुळे पहिल्यांदा सुपरहिरो मिळाला. या चित्रपटाचे 3 भाग आले आहेत, आता त्याच्या चौथ्या भागाच्या रिलीजबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. आता हृतिक रोशननंतर रणवीर कपूरही या ब्लॉकबस्टर फ्रेंचायझीचा भाग होणार आहे. यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.