IND vs AUS : 3 सामने आणि 15 खेळाडू, ऋतुराज कॅप्टन, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर
GH News October 22, 2024 07:13 PM

टीम इंडिया सध्या मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर टीम इंडिया रोहित शर्मा याच्यात नेतृत्वात 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रतिष्ठेची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सीरिज खेळणार आहे. एकूण 5 सामन्यांची ही मालिका असणार आहे. बीसीसीआय निवड समितीने त्याआधी 15 सदस्यीय टीम इंडिया ए संघ जाहीर केला आहे. टीम इंडिया ए चं 27 वर्षीय खेळाडूला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ईशान किशन याचं संघात झालं आहे. इंडिया ए ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध 2 फर्स्ट क्लास मॅचेस खेळणार आहे. तर एका सामन्यात टीम इंडिया सीनिअर विरुद्ध इंडिया ए आमनेसामने असणार आहेत.

बीसीसीआयने पुणेकर ऋतुराज गायकवाड याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. ऋतुराज सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्रचं नेतृत्व करतोय. तसेच ऋतुराजने इराणी कप स्पर्धेत रेस्ट ऑफ इंडियाची कॅप्टन्सी केली होती. ऋतुराज सध्या शानदार कामगिरी करतोय. ऋतुराजने मुंबई विरुद्ध 87 चेंडूत शतकी खेळी केली. तर अभिमन्यू इश्वरन याला उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ईशान किशनचं कमबॅक

ईशान किशन यालाही इंडिया ए मध्ये स्थान देण्यात आलं आहे. ईशान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्या जोरावर ईशानचा समावेश करण्यात आला आहे.

सामन्यांचं वेळापत्रक

इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, 31 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर, मॅके

इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए, 7 ते 10 नोव्हेंबर,  मेलबर्न

टीम इंडिया विरुद्ध इंडिया ए, 15 ते 17 नोव्हेंबर, पर्थ

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ए स्क्वाड

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया ए : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), अभिमन्यु ईश्वरन (उपकर्णधार), साई सुदर्शन, नीतीश कुमार रेड्डी, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, बाबा इंद्रजीत, इशान किशन (विकेटकीपर), अभिषेक पोरेल (विकेटकीपर), मुकेश कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी, यश दयाल, मानव सुथार आणि तनुष कोटीयन.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.