रिषभ पंतने दिल्ली कॅपिटल्स सोडली? आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी उचलले मोठे पाऊल
Marathi October 22, 2024 09:24 PM

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत यांच्यात सर्वकाही ठीक चालेले दिसत नाही. आतापर्यंत दिल्लीकडून कोणत्या खेळाडूंना कायम ठेवण्यात कोणतेही अपडेट आले नाही. या बाबात कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. आता यावेळी दिल्लीचे व्यवस्थापनही बदलले असून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. रिटेन्शन लिस्ट जाहीर होण्याच्या सुमारे नऊ दिवस आधी पंतने आता इन्स्टाग्रामवर दिल्लीला अनफॉलो केले आहे. पंतने दिल्लीला अनफॉलो करणे हा एक मोठा संकेत आहे की त्याच्या आणि संघात सध्या सर्व काही ठीक नाही आहे.

पंतने नुकतीच एक्स अकाऊंटवर धक्कादायक पोस्ट केली होती. ज्यानंतर बरीच चर्चा झाली होती. 12 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा पंतने पोस्ट केले होते, ज्यामध्ये त्याने असे लिहले होते की, “मी लिलावात गेलो तर मला विकले जाईल की नाही आणि विकले तर मला किती किंमतीला विकले जाईल?” पंत यांच्या या पोस्टवरही अनेक शक्यता व्यक्त केल्या जात होत्या.

बांग्लादेशविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर पंत लगेचच दुबईला गेला. तिथे त्यांनी जीएमआर ग्रुपच्या दिल्लीस्थित सहमालकाचीही भेट घेतली. जीएमआर ग्रुप 2025 आणि 2026 मध्ये दिल्ली पुरुष संघाचे व्यवस्थापन करत आहे.

जेएसडब्ल्यू आणि जीएमआर गटांनी सहमती दर्शवली आहे की दोघेही प्रत्येकी दोन वर्षे संघ चालवतील. जीएमआरमध्ये आल्यावर संघात मोठे बदल सुरू झाले. संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि क्रिकेट संचालक बदलण्यात आले आहेत. हेमांग बदानी यांना मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले असून सौरव गांगुलीच्या जागी वेणुगोपाल राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गांगुली पुढील दोन हंगामात दिल्ली पुरुष संघासोबत दिसणार नाही.

या नव्या करारात दोन्ही गट फक्त लिलावात आणि कर्णधाराची नियुक्ती करताना एकत्र येतील. मात्र, दोन्ही गटात कर्णधारपदावर एकमत होत नसल्याचे दिसून येत आहे. कदाचित त्यामुळेच पंतचे प्रकरण सतत गुंतागुंतीचे होत चालले आहे.

हेही वाचा-

IND VS NZ; दुसऱ्या टेस्टसाठी टीम इंडिया पुण्यात दाखल; बीसीसीआयने शेअर केला VIDEO
वडिलांची एक चूक, अन् जेमिमा रॉड्रिग्जचे सदस्यत्व रद्द! खार जिमखाना क्लबची मोठी कारवाई
मोठी बातमी..! “जास्त वजन आणि शिस्तभंग प्रकरणी” पृथ्वी शॉची मुंबई संघातून हकालपट्टी


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.