How To Use Coconut Oil On Hair: केसांच्या सगळ्या समस्यांपासून सुटका, नारळाचं तेल लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
Times Now Marathi October 22, 2024 11:45 PM

: केसांचे आरोग्य जपण्यासाठी तेल लावणं खूप आवश्यक आहे. तुमच्या केसांसाठी तुम्ही योग्य तेलाची निवड करणं आवश्यक आहे. भारतात बहुतांश लोक केसांना नारळाचं तेल लावतात. नारळाच्या तेलामुळे केसांचं पोषण होतं. तसेच केसांचा कोरडेपणा कमी होण्यासाठी आणि कंडिशनिंगसाठी नारळाचं तेल उपयुक्त आहे. ()

रोज नारळाचं तेल लावल्यामुळे केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. तसेच केसांमधला कोंडाही नारळाचे तेल वापरल्यामुळे कमी होतो. नारळाचे तेल केसांना लावल्यामुळे रक्ताभिसरणही सुधारते. () पण नारळाचं तेल केसांना लावण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहिती आहे का ? आज आपण केसांना नारळाचं तेल लावण्याची योग्य पद्धत जाणून घेणार आहोत. ()


नारळाचे तेल इतर तेलांसोबत मिक्स करा (Mixing Coconut Oil With Other Oils)नारळाच्या तेलामध्ये तुम्ही कॅस्टर ऑईल, बदामाचं तेलं, ऑलिव्ह ऑईल मिक्स करु शकता. नारळाच्या तेलामध्ये दुसरं तेल मिक्स करुन लावल्यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात.


कडिपत्ता आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण (Curry Leaves And Coconut Oil)एका भांड्यामध्ये नारळाचं तेल घ्या. साधारणपणे 8-10 कडिपत्त्याची पाने या तेलामध्ये टाका आणि तेल गरम करा. हे तेल काही वेळ थंड होऊ द्या. थंड झाल्यावर हे तेल केसांना लावा. कडिपत्ता आणि नारळाचं तेल मिक्स करुन लावल्याने डँड्रफचं प्रमाण कमी होतं.


नारळाचे तेल आणि कापूर (Camphor And Coconut Oil)नारळाच्या तेलामध्ये कापूर मिक्स करुन लावणेही केसांसाठी फायदेशीर ठरते. कापूराच्या 1-2 गोळ्यांची पूड करुन ती नारळाच्या तेलामध्ये टाका. काही सेकंद हे तेल गरम करा. हे तेल थंड झाल्यावर केसांना लावा. साधारणपणे 4-5 तासांनी केस शॅम्पूने धुवा. तुम्हाला लवकरच या तेलाचे चांगले परिणाम दिसतील.

नारळाचे तेल आणि तुरटी (Alum And Coconut Oil)नारळाच्या तेलामध्ये तुरटी मिक्स करुन लावल्यामुळे केसगळती कमी होते. नारळाचे तेल गरम करुन त्यात तुरटी मिक्स करा. त्यानंतर या तेलाने केसांना मसाज करा. काही वेळाने केस शॅम्पूने धुवा.



(Disclaimer - या लेखातील माहिती सर्वसामान्य गृहितकांवर आधारित आहे. या लेखातील माहितीसंदर्भात Times Now Marathi कोणताही दावा करत नाही. केसांच्या समस्यांसाठी तज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. )

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.