Raid on abhijit katke house KP
Marathi October 23, 2024 02:25 AM


महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी पैलवान अभिजित कटके यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. अभिजीत कटके यांच्या वाघोलीतील घरी ही छापेमारी झाली असून त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

पुणे – सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच पुण्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी पैलवान अभिजित कटके यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. अभिजीत कटके यांच्या वाघोलीतील घरी ही छापेमारी झाली असून त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. तसेच यामध्ये महत्वाचे म्हणजे अभिजीत कटके हे भाजप नेते अमोल बालवडकर यांचे मेहुणे आहेत. तसेच ही छापेमारी राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे देखील बोललं जात आहे. (Raid on abhijit katke house.)

हेही वाचा : SS UBT : विष्णूच्या तेराव्या अवतारासमोर बसले की चौदाव्या? ठाकरे गटाचा सरन्यायाधीशांसह मोदींवर निशाणा

– Advertisement –

पैलवान अभिजीत कटके हे भाजपा नेते अमोल बालवडकर यांचे मेहुणे आहेत. विधानसभा निवडणुकीत अमोल बालवडकर यांनी भाजपाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेत बालवडकर यांना समजावण्याचा प्रयत्न केला, तरी अमोल बालवडकर हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळेच आता अमोल बालवडकर यांच्यावर दबाव टाकण्यासाठी ही छापेमारी झाली की काय ? अशी शंका उपस्थिती केली जात आहे.

हेही वाचा : Maharashtra Assembly Election : शेकापचे जयंत पाटील आज संध्याकाळी 4 वाजता करणार मोठी घोषणा, अलिबागमध्ये शेकापचा भव्य मेळावा

– Advertisement –

कोथरुड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे बंडखोरी करणार असल्याची चर्चा  आहे. त्यामुळे अमोल बालवडकर यांच्या सासरवाडीत म्हणजेच अभिजीत कटके यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्याची चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) सकाळी 7 वाजल्यापासून अभिजीत कटके यांच्या वाघोली येथील घरी आयकर विभागाचे अधिकारी तपासणी करत आहेत.

कोण आहेत अमोल बालवडकर ?

अमोल रतन बालवडकर हे सामाजिक कार्यकर्ते आणि पुणे महापालिकेतील बाणेर – बालेवाडी प्रभागातील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक आहेत. मार्च 2017 मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत ते विजयी झाले. ते भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे शहराचे सरचिटणीसही आहेत. गेली 10 वर्ष ते भाजपमध्ये सक्रिय आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये अमोल बालवडकर यांचा मोठा सहभाग असतो. स्थानिक पातळीवर बालवडकर यांचा चांगला दबदबा आहे. सामान्य नागरिकांनाही अमोल बालवडकर हे नाव परिचयाचे आहे. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर बालवडकर यांनी थेट चंद्रकांत पाटलांच्या विरोधात दंड थोपटल्याने सध्या ते चांगलेच चर्चेत देखील आहेत.

कोण आहेत अभिजीत कटके ?

अभिजीत कटके यांनी कुस्ती या खेळात मोठी कामगिरी केली आहे. एकवेळा महाराष्ट्र केसरी तर दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरीची गदा अभिजीत कटकेंनी जिंकली आहे. अभिजीत कटके पुण्यातील शिवरामदादा तालमीचे पैलवान आहेत. अभिजीत यांनी 2015 मध्ये युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता. तर 2016 मध्ये ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.


Edited By Komal Pawar Govalkar



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.