Viral: ना कुठला डान्स..ना कुठली स्टाईल..तरीही मिळाले 3 कोटी व्ह्यूज? 'तिने' असं केलं तरी काय? व्हायरल व्हिडीओ
एबीपी माझा वेब टीम October 23, 2024 11:13 AM

Viral: सोशल मीडियावर आजकाल काय व्हायरल होईल याचा नेम नाही, आणि लोकं त्या पोस्ट किंवा व्हिडीओला पाहतात सुद्धा.. आणि भरभरून कमेंट्स करतात सुद्धा.. ते म्हणतात ना आजकाल सोशल मीडिया का जमाना हैं...! अनेक लोकं आपल्यातल्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करतात, तर काही लोक विचित्र व्हिडिओ शेअर करून फेमस बनतात, काही पोस्ट किंवा व्हिडीओ असे असतात, जे पाहून आपल्याला हसू आवरता येत नाही. असाच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये एक महिलेनं असं काहीतरी केलं की या व्हिडीओने तब्बल 30 लाख लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये तिने कोणताही फॅन्सी मेक-अप केलेला नाही, ना तिने डान्स केला आहे आणि ना तिने कोणतीही स्टाईल दाखवली आहे...

व्हिडिओमध्ये काय खास आहे?

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये महिलेने काही विशेष केले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या व्हिडिओला काहीही न करता 3 कोटींहून अधिक व्ह्यूज कसे मिळाले याबद्दल कोणलाही माहिती नाही. यामध्ये महिला ना डान्स करत आहे, ना कुठली स्टाईल दाखवत आहे ना अभिनय करत आहे, तरीही लोक हा व्हिडीओ पाहत आहेत. हा व्हिडीओ आम्ही इथे शेअर करत आहोत. या व्हायरल व्हिडिओवर लोकांनी खूप मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by it's khushi (@khushivideos1m)

सोशल मीडियावर काहीही व्हायरल होऊ शकते..!

हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर काहीही व्हायरल होऊ शकते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. याशिवाय काय व्हायरल होईल आणि का होईल हे सांगता येत नाही. हा व्हिडीओ 19 ऑक्टोबर रोजी khushivideos1m नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये महिला कॅमेरा ऑन ठेवून पळताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये या महिलेने पिवळ्या रंगाचा सूट घातला असून तिने ‘तू रूठा तो रूठ के इतनी दूर चली जाऊंगी…’ या गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडीओमध्ये महिला कॅमेरा सुरू ठेवून सरळ रेषेत धावताना दिसत आहे. त्या पोस्टमध्ये एक कबूतरही दिसत आहे.

यूजर्सकडून मजेदार कमेंट्स

या व्हिडीओवर आतापर्यंत 789189 लाईक्स आणि 57000 हून अधिक कमेंट्स करण्यात आल्या आहेत. या पोस्टवर अनेक मजेदार कमेंट्स आल्या आहेत, अगदी स्विगी इंस्टामार्टने त्यावर कमेंट करून 'जेव्हा डिलिव्हरी पुढच्या बिल्डिंगमध्ये आहे' असे लिहिले आहे. तर एका यूजरने 'Woman for a reason' अशी कमेंट लिहिली. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले की, 'मुन्नी पुन्हा पाकिस्तानात गेली आहे. दुसरा युजर म्हणाला - 'तुझा अभिनय पाहून कबुतराने आत्महत्या केलीय.

Viral: 'आमदार साहेब..माझे लग्न लावून द्या..!' पेट्रोल पंपावर एका मतदाराची अनोखी मागणी, आमदारही झाले नि:शब्द, व्हायरल व्हिडीओ

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.