लहान भावाने माझा विश्वासघात केला, जो भावाचा नाही झाला तो जनतेचा काय होणार? केदा आहेरांची टीका
संदीप जेजुरकर October 23, 2024 11:13 AM

नाशिक : विधानसभेच्या निवडणुका (Vidhan Sabha Election 2024)  जाहीर झाल्या तशी नाशिक जिल्ह्यातील चांदवड - देवळा मतदारसंघातील (Chandwad Deola Assembly Election)  भाऊबंदकी रंगू लागली आहे. भाजपचे आमदार डॉ.राहुल आहेर यांनी माझा विश्वासघात केला आहे. जो भावाचा नाही झाला तो जनतेचा काय होणार? अशा शब्दात केदा आहेर (Keda Aher)  यांनी भाजपचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्यावर टीका केली आहे.  नाशिकच्या चांदवड येथे झालेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात त्यांनी जनतेच्या आशिर्वादावर निवडणूक लढविणार असे जाहीर केले आहे.  केदा आहेरांना भाजपची उमेदवारी न मिळाल्याने नाशिकच्या देवळ्यात, नगराध्यक्ष, उपनगरध्यक्षांसह देवळा नगरपंचायतीच्या 15 नगरसेवकांचा राजीनामा दिला आहे. 

जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे होती. माझ्या जीवावर त्यांनी दोन वेळेला आमदारकी भोगली, आता सन्मानाने बाजूला व्हायला पाहिजे होते मात्र त्यांनी माझ्याशी गद्दारी केल्याचाही आरोपही केदा आहेर यांनी केला. राजकारणाच्या पलीकडे देखील भाऊबंदकी, परिवार, कुटुंब असते. पाच वर्ष कसायला जमीन दिली तर हा म्हणतो मााझ्याच नाववर सातबार आहे, काही न्यायनीती आहे की नाही? असे देखील  केदा आहेर म्हणाले. 

जनतेच्या न्यायालयात दाद मागणार:  केदा आहेर

मी आज जनतेच्या न्यायालयात आलेलो आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे. देवळा येथे मेळावा होणार आहे. या मेळाव्यात मी देवळाकरांचे म्हणणे ऐकणार आहे. तसेच माझी भूमिका मांडणार आहे. ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे.  मी  खुर्चीसाठी लाचार नाही. मी  अनेक नगरसेवक, सभापती, उपसभापती, आमदार केले. स्वत:ला कोणी मोठे समजू नका, आपण जनतेचे सेवक आहोत. ही जनता डोक्यावर पण घेते आणि पायाखाली देखील तुडवते, अशी टीका देखील केली आहे.

मला वेड्यात काढले, माझ्या भावनेशी खेळले : केदा आहेर 

केदा आहेर म्हणाले,   17 तारखेला पत्रकार परिषद घेतली. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीचा निर्णय 16 सप्टेंबरलाच दिल्लीत झाला होता. मला वेड्यात काढले, माझ्या भावनेशी खेळले. जनतेसाठी 10 वर्ष मी राबलो. मला भावना आहे, मी पण माणूस आहे. मेळाव्यात पुढील दिशा ठरवणार आहे. 

केदा आहेर बंडखोरी करण्याच्या पवित्र्यात

केदा आहेरांना भाजपची उमेदवारी न मिळाल्याने नाशिकच्या देवळ्यात, नगराध्यक्ष, उपनगरध्यक्षांसह देवळा नगरपंचायतीच्या 15 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. केदा आहेर बंडखोरीच्या पवित्र्यात आहे. नगराध्यक्ष, उपनगरध्यक्षांसह देवळा नगरपंचायतीच्या 15 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे.  केदा आहेर यांना भाजपची उमेदवारी न मिळाल्याने देवळ्यात राजीनामा सत्र सुरू आहे.  भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष किशोर चव्हाण, महिला आघाडीच्या उपजिल्हाध्यक्ष बबिता देवरे यांनी याआधीच राजीनामा दिला.   चांदवड - देवळा मतदारसंघाची भाजप उमेदवारी पुन्हा डॉ.राहुल आहेर यांना मिळाल्याने केदा आहेर समर्थक नाराज आहेत.  भाजपची उमेदवारी न मिळाल्याने नाराज केदा आहेर बंडखोरी करण्याच्या पवित्र्यात आहे. 

हे ही वाचा :

मुख्यमंत्री, पंतप्रधान केलं तरी थांबणार नाही, दिनकर पाटील यांची आक्रमक भूमिका, सीमा हिरेंच्या उमेदवारीला विरोध, भाजपची डोकेदुखी वाढणार? 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.