Charcoal Toothpaste : चारकोल टूथपेस्ट वापरण्यापूर्वी या बाबींकडे द्या लक्ष
Marathi October 23, 2024 12:25 PM

दात हा आपल्या शरीराचा असा भाग आहे जो आपल्या रोजच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतो. दातांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. जर असं केलं गेलं नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर होऊ शकतो. हेही खरं आहे की जर दात सुंदर असतील तर आपणही सुंदर दिसतो. यासाठीच दातांची काळजी घेण्यात कोणतीच कसर सोडू नये. आजकाल दातांच्या संरक्षणासाठी चारकोल टूथपेस्टचा वापर करण्याचा ट्रेंड आलाय. अॅक्टिव्हेटेड चारकोलपासून बनलेली टूथपेस्ट दातांना स्वच्छ तर करतेच पण दातांची चमकही वाढवते. चारकोलपासून बनलेल्या गोष्टी वापरण्याचा सध्या ट्रेंड आलाय.

लोक चारकोलपासून बनलेले फेसवॉश, फेस क्रीम आणि फेसपॅक लावतात. तुम्हीदेखील चारकोलने तुमच्या दातांना चमकवण्याचा प्रयोग करुन पाहिला असेल. जाणून घेऊयात सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या चारकोलचे फायदे आणि नुकसान यांच्याबद्दल.

– जाहिरात –

चारकोलचा इतिहास :

तुम्हाला अॅक्टिव्हेटेड चारकोलबद्दल, त्याच्या इतिहासाबद्दल काही माहिती आहे का? आधी करण्यात आलेल्या संशोधनानुसार, चारकोलचा सर्वप्रथम वापर हा जवळपास इसवी सन पूर्व 3750 शतकात करण्यात आला होता. असं म्हटलं जातं की सगळ्यात आधी कांस्य बनवण्यासाठी चारकोलचा वापर करण्यात आला होता. भारतात हे जवळपास इसवी सन पूर्व 400 व्या शतकात आलं. भारतात याचा वापर पाणी शुद्ध करण्यासाठी केला गेला. यादरम्यानच चारकोलच्या अँटिसेप्टिक गुणांबद्दल लोकांना माहिती मिळाली.

– जाहिरात –

चारकोल टूथपेस्टचे फायदे :

चारकोल टूथपेस्टमध्ये अॅक्टिव्हेटेड चारकोलचा वापर केला जातो. जे पृष्ठभागावर जमलेली घाण शोषून घेण्याचं काम करते. अॅक्टिव्हेटेड चारकोल ही एकप्रकारची पावडर असते. जी लाकूड किंवा नारळाची किशी म्हणजेच नारळाच्या केसांपासून बनवण्यात येते. ही पेस्ट दातांच्या पृष्ठभागाची स्वच्छता करण्यासाठी योग्य समजली जाते. सोबतच ही टूथपेस्ट तोंडाच्या दुर्गंधीलाही दूर करण्याचं काम करते.

चारकोलने होणारे नुकसान :

चारकोल पावडर लावत असताना ती खूपच रगडून जर दातांना लावण्यात आली तर दाताच्या हिरड्यांना याचा त्रास होऊ शकतो. तसेच पुन्हापुन्हा ही पेस्ट मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात लावल्याने दात पिवळे पडण्याचाही धोका निर्माण होतो. एक नुकसान हेदेखील आहे की चारकोल टूथपेस्ट बनवणाऱ्या अनेक कंपन्या यामध्ये फ्लुओराइडचा वापर करत नाहीत. फ्लुओराइड हे दात किडण्यापासून आपल्याला वाचवू शकते.

हेही वाचा : Health Tips : दृष्टीक्षमता वाढवण्यासाठी डाएटमध्ये समाविष्ट करा हे पदार्थ


संपादन- तन्वी गुंडये

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.