Maharashtra Assembly Elections 2024 LIVE updates : मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर सतेज पाटील अन् आघाडीच्या नेत्यांची तातडीची बैठक!
Sarkarnama November 06, 2024 06:45 AM
Satej Patil News : अजिंक्यतारा ऑफिसवर इंडिया आघाडीची तातडीची बैठक

काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा ऑफिसवर इंडिया आघाडीची तातडीची बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीला सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीचे घटक पक्ष उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. कालच्या घडामोडीनंतर विधानसभा निवडणुकीला कसं सामोरे जायचं याबाबत विचारमंथन या बैठकीत केलं जाणार आहे.

Maharashtra Assembly Election : संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

अमेरिकेतील निवडणूक मतपत्रिकेवर होत आहे ही बाब देशातील निवडणूक आयोगाच्या लक्षात येत नसेल का? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाते नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. शिवाय यावेळी त्यांनी राज्यात सरकारी गाड्यांमधून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसंच यावेळी त्यांनी मोदी-शहांवर हल्लाबोल करतानाच राज ठाकरेंवरही टीका केली.

NCP AP News : विधानसभेसाठी अजितदादांचा वादा काय? उद्या कळणार

विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा उद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याची सुत्रांची माहिती आहे.

Salman Khan threat : सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी!

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानला सतत धमकीचे फोन येत आहेत.

Pune Congress : बंडखोरांना काँग्रेसचा इशारा

पुण्यातील काँग्रेसच्या बंडखोरांना पक्षाकडून प्रस्ताव दिला जाणार आहे. अर्ज माघारीची मुदत संपूनही अर्ज कायम ठेवले असले तरी त्यांनी आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करावा अन्यथा त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Shivsena News : दोन्ही शिवसेना नेत्यांच्या तोफा कोल्हापुरात धडाडणार

विधानसभा निवडणुकीला अवघे 15 दिवस उरले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. अशातच आज दोन्ही शिवसेनेचे प्रमुख नेते कोल्हापुरातून प्रचाराला सुरूवात करणार आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.