Balasaheb Thorat warning to Radhakrishna Vikhe Patil and Sujay Vikhe rrp
Marathi November 06, 2024 09:24 AM


गेल्या काही काळापासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यात वेगळाच वाद रंगताना दिसत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी कोल्हार गावात आयोजित सभेत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला.

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असून आता प्रचाराच्या तोफा धडाडताना दिसणार आहेत. महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतील. मात्र गेल्या काही काळापासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्यात वेगळाच वाद रंगताना दिसत आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी कोल्हार गावात आयोजित सभेत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला. (Balasaheb Thorat warning to Radhakrishna Vikhe Patil and Sujay Vikhe)

कोल्हार गावातील आयोजित सभेत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, आजच्या सभेला कुणाला बोलावलं, बस भरून आणल्या, खाटुक खुटुक ठेवलं असं काहीही झालं नाही. पण आजची उत्स्फूर्त सभा आहे आणि अशी सभा विजयाची असते. बाजार समिती निवडणुकीच्या वेळी कोल्हारमध्ये भगवती मातेच्या दर्शनाला आलो होतो. तेव्हा म्हणालो होतो मी पुन्हा येणार, पुन्हा येणार आणि खरंच पुन्हा आलो आहे. गणेश कारखाना निवडणुकीच्या वेळी देखील दर्शन घेऊन गेलो होतो. लोकसभेचा प्रचार सुरू असताना सुद्धा देवीचे आशिर्वाद घेऊन गेलो होतो. आताही आशिर्वाद घेतले आहेत. भगवती माता ही लढाईची देवता आहे, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी विखे पिता-पुत्रांवर निशाणा साधला.

– Advertisement –

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : सयाजी शिंदेंनंतर प्रसिद्ध विनोदी अभिनेता करणार घड्याळाचा प्रचार

सुजय विखेंबद्दल बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ते (सुजय विखे) आता संगमनेर तालुक्यात फिरत आहेत. मध्यंतरी त्यांनी काय उद्योग करून ठेवले? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, हे जिथे जातात तिथे त्यांना दुष्ट बुध्दी सुचते. त्या गड्याला वान नाही पण गुण लागला आहे. मागे एकदा वाईट बोलल्यावर दहा पंधरा मिनिटात महिला मंडळ सभेच्या स्टेजवर आलं होतं. गाव उठून आलं होतं. मात्र याचा अर्थ ते सगळे आमचे होते असे नाही. माझे विरोधक देखील म्हणतात तो वाईट बोलला. त्यामुळे अख्खा तालुका उठून आला होता. 15 मिनिटात सगळे रस्ते बंद केले होते. पळता भुई थोडी झाली होती. कुपाटी कुपाटीने पळाला आणि दुसऱ्या दिवशी काटे काढत होता, अशी खिल्ली बाळासाहेब थोरातांनी उडवली.

– Advertisement –

आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका मोडून काढला तर तुलना करायला कुणी राहणार नाही. म्हणून ते (राधाकृष्ण विखे पाटील) संगमनेर मोडायला निघाले आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा हेच म्हणेन की, राहाता आणि संगमनेर अशी तुलना होऊन जाऊ द्या. आम्ही सरसच राहु. पण आता आम्हाला संगमनेरसोबत राहाता तालुका देखील बदलायचा आहे. लोक म्हणतात आता ते (राधाकृष्ण विखे पाटील) खूप चांगले वागतात. खरं तर आम्ही इकडे आलो म्हणून ते चांगले वागत आहेत. नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता. कारण गणेश कारखाना आणि राहुरी कारखान्याची वाट लावली. दूध संघाचा सपाटा झाला. मात्र दिल्लीत गेलं की, महाराष्ट्रातलं सहकार क्षेत्रातलं सर्वात मोठं व्यक्तिमत्त्व म्हणजे हे (राधाकृष्ण विखे पाटील) आहेत, अशी मिश्किल टिप्पणी बाळासाहेब थोरात यांनी केली.

हेही वाचा – SS UBT Vs BJP : सर्वमान्य राष्ट्रीय बनवेगिरी म्हणजे निवडणुका, ठाकरे गटाचा घणाघात


Edited By Rohit Patil



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.