वाढते प्रदुषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. प्रदुषणाची समस्या केवळ आरोग्याच्या समस्याच नाही तर केसांच्या तक्रारी वाढवत आहेत. प्रदुषणामुळे केस कोरडे होणे, निस्तेज आणि कमकुवत होतात. यावर उपाय म्हणून अनेक स्त्रिया पार्लरमध्ये जाऊन महागडी हेअर ट्रिटमेंट घेतात, बाजारात मिळणारी हेअर्स प्रॉडक्ट वापरतात. पण, परिणाम हवा तसा मिळत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही घरच्या घरीच हेअर मास्क तयार करून वापरायला हवा. होममेड हेअर मास्कमुळे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट होत नाही.
हेअर मास्कमुळे केसांना पोषण मिळते आणि केस मजबूत होतात. याशिवाय केस मऊ होतात आणि केसगळती देखील थांबते. जाणून घेऊयात, केसांसाठी घरी कोणते हेअर मास्क बनवता येतील.
एवोकाडोमध्ये हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन C सारखे पोषक घटक असतात. अंड केसांसाठी फायदेशीर असते. तुम्ही एवोकाडो आणि अंड्याचा हेअर मास्क तयार करण्यासाठी अंड आणि एवाका़डो मिक्स करून घ्या आणि त्याचे मिश्रण केसांना 30 मिनिटांसाठी लावून ठेवा. 30 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवून घ्या.
प्रोटीन आणि निकोटोनिक अॅसिड मेथीच्या दाण्यांमध्ये आढळते, जे केस मजबूत करतात. याचा हेअर मास्क तयार करण्यासाठी रात्रभर पाण्यात मेथीचे दाणे भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट तयार करावी. तयार पेस्ट केसांवर 30 मिनिटांसाठी लावावा. 30 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवून घ्या.
आवळ्यात व्हिटॅमिन C असते. याचा हेअर मास्क तयार करण्यासाठी आवळ्याची पावडर तयार करून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. तयार पेस्ट केसांना हेअर मास्क म्हणून लावता येतील.
दही आणि मधाचा हेअर मास्क केसांसाठी फायदेशीर असतो. मधामुळे निस्तेज केस मऊ होतात. दही आणि मधाचं हेअर मास्क बनवण्यासाठी 2 ते 3 चमचे दही आणि 2 ते 3 चमचे मध मिक्स करा आणि तयार पेस्ट केसांना लावा. तुमचा होममेड हेअर मास्क तयार झाला आहे.
हेही पाहा –
संपादन – चैताली शिंदे