Refrigerator storage tips :फ्रीजमध्ये कोणते पदार्थ ठेवावेत आणि कोणते ठेवू नयेत?
Marathi November 06, 2024 06:24 PM
आजकाल कोणाकडे फ्रीज नाही असे घर सापडणे थोडे मुश्किल आहे. फ्रीज घरातील अत्यावश्यक घटक असल्याने तो नसेल अनेक गृहीणींची तारांबळ उडू शकते. आठवड्याच्या भाज्या स्टोअर करण्यासाठी फ्रीजचा वापर केला जातो. शिळे पदार्थ, फळे असे पदार्थही स्टोअर करण्यात येतात. विशेष करून उन्हाळ्यात फ्रीजचा वापर जास्त केला जातो. उन्हाळ्यात थोडावेळ जरी पदार्थ बाहेर ठेवलेत तर खराब होण्याची शक्यता असते. पदार्थ टिकवण्यासाठी फ्रीजचा वापर होत असला तरी प्रत्येक गोष्ट फ्रीजमध्ये ठेवू नये. काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्याने लवकर खराब होतात. त्यामुळे जाणून घेऊयात, फ्रीजमध्ये कोणते पदार्थ ठेवावेत आणि कोणते ठेवू नयेत
फ्रीजमध्ये हे पदार्थ ठेवावेत
- फ्रीजमध्ये तुम्ही अंड स्टोअर करू शकता. अंडी बाहेर ठेवल्याने खराब होतात तसेच त्याचे कवचही खराब होते. त्यामुळे अंडी जास्त काळ टिकवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावीत.
- खजूराचा ओलावा टिकवून ठेवायचा असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये खजूर ठेवायला हवेत. खजूर बाहेर ठेवल्याने कोरडे होतात आणि त्याची चव बदलू शकते.
- सफरंचद फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील एन्झाइम्स अॅक्टीव होतात आणि सफरचंद लवकर पिकते. त्यामुळे सफरंचद फ्रीजमध्ये स्टोअर करायची असतील कागदात गुंडाळून ठेवा.
- बदाम फ्रीजमध्ये जास्त काळ टिकवून ठेवायचे असतील तर फ्रीजमध्ये ठेवायला हवेत.
- लिंबू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. लिंबू बाहेर ठेवल्यास त्याची चव बदलते.
- जॅम फ्रीजमध्ये ठेवावे, फ्रीजमध्ये जॅम ठेवल्याने घट्ट राहतो आणि त्याचा रंगही बदलत नाही.
हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवू नयेत –
- केळी चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नयेत. केळी फ्रीजमध्ये ठेवल्याने लवकर खराब होतात, काळी सुद्धा पडतात.
- लसूण फ्रीजमध्ये ठेवू नये, थंड वातावरणामुळे लसणाला बुरशी लागू शकते. ज्यामुळे लसूण खराब होतो.
- मध फ्रीजमध्ये ठेवू नये. मधात पाण्याचे प्रमाण कमी आणि आम्लता जास्त असते. त्यामुळे जेव्हा आपण फ्रीजमध्ये मध ठेवतो तेव्हा त्यातील साखरेचा भाग वेगळा होतो.
- टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचा पोत आणि चव बदलते. त्यामुळे टोमॅटो जास्त काळ टिकवायची असतील फ्रीजमध्ये ठेवू नये.
- ब्रेड फ्रीजमध्ये ठेवल्याने लवकर कोरडा होतो. त्यामुळे चुकूनही फ्रीजमध्ये ब्रेड ठेवू नये.
- फ्रीजमध्य़े मसाले ठेवल्याने त्याचा सुगंध नाहीसा होतो. याला फ्रीजचे तापमान आणि दमटपणा कारणीभूत ठरतो.
- केसरही फ्रीजमध्ये ठेवू नये. असे केल्याने केसरच्या गाठी तयार होऊ शकतात. ज्यामुळे त्याची चव बिघडू शकते.
हेही पाहा –
संपादन – चैताली शिंदे